सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले हे निर्देश

by India Darpan
जानेवारी 28, 2025 | 3:25 pm
in संमिश्र वार्ता
0
जीबीएस विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपायायोजनांबाबत बैठक 1 1024x554 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसओपीची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच जीबीएस रुग्णांची दैनंदिन अद्ययावत माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त यांना सादर करावी, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठकीत दिल्या.

मंत्रालय येथे जीबीएस विषाणूच्या प्रादुर्भावबाबत झालेल्या आढावा बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, आयुषचे संचालक डॉ.रमण घुंगराळेकर आदी प्रत्यक्ष तर सर्व शासकीय वैद्यकीय, आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता तसेच टास्क फोर्सचे अध्यक्ष दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, या विषाणूबाबत नागरिकांमध्ये उपाययोजनांसाठी जनजागृती करण्यात यावी. ज्यामुळे विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे आरोग्य यंत्रणांनी देखील आवश्यक औषध पुरवठा आणि साधनसामुग्री उपलब्ध करून घ्यावी, असेही यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

जीबीएस आजाराची सर्वसाधारण लक्षणे :
-अचानक पायातील किंवा हातात येणारी कमजोरी किंवा लकवा
-अचानकपणे उद्भवलेला चालण्यातील त्रास किंवा कमजोरी
-जास्त दिवसांचा डायरिया
-अशा प्रकारचे लक्षणे जाणवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता सरकारी रुग्णालयात तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात

जीबीएस विषाणुपासून बचावाच्या उपाययोजना :
-पाण्याचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी पिण्याचे पाणी उकळून प्यावे.
-ताजे आणि स्वच्छ अन्न पदार्थांचे सेवन करावे. संसर्ग टाळण्यासाठी शिजवलेले आणि न शिजवलेले अन्नपदार्थ एकत्र ठेवू नये.
-वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

टेलिग्रामच्या माध्यमातून सायबर भामट्यांनी महिलेस तीन लाखाला असा घातला गंडा…

Next Post

नाशिक शहरातील वृध्दास ३६ लाखाला गंडा…फसवणुकीचा गुन्हा दाखल

India Darpan

Next Post
fir111

नाशिक शहरातील वृध्दास ३६ लाखाला गंडा…फसवणुकीचा गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

Screenshot 20250623 130005 Collage Maker GridArt

नगरसुल रेल्वे स्थानकावर नंदिग्राम, जनशताब्दी, तपोवन एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी…

जून 23, 2025
Untitled 76

हे माजी पंतप्रधान स्वतःचे सामान घेऊन ट्रेनमधून जेव्हा बाहेर उतरतात…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 23, 2025
Screenshot 20250623 115337 Collage Maker GridArt

राजकारणाचा खेळखंडोबा….नाशिकमध्ये मंत्री अस्वस्थ, आमदार व्यस्त, अधिकारी व नागरिक त्रस्त तर विरोधक सुस्त…

जून 23, 2025
IMG 20250621 WA0253 1

पंतप्रधान श्री केंद्रीय विद्यालय क्र. १ देवळाली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जून 23, 2025
Untitled 75

नाशकात ही कंपनी करणार कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक…

जून 23, 2025
om birla arrival 1024x576 1

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन…असे आहे कार्यक्रम

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011