सोनीपत ( हरियाणा ): एखाद्या महिलेचा विनयभंग होतो तेव्हा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येतो, परंतु हरियाणामध्ये एका पोलीसाने आपल्या सहकारी महिला पोलीसावर पोलिस ठाण्यातच बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याने घटनेची माहिती कोणाला दिली तर तिला ठार मारण्याची आणि नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली. यापूर्वीही आरोपीने पोलीस ठाण्यात अनेक वेळा तिच्याशी अश्लील चाळे केले होते.
मूळची जिंद जिल्ह्यातील एक महिला ही सोनीपत येथील शहर पोलीस ठाण्यात तैनात आहे. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तिचा सहकारी पोलीस सतीश सिंग हा तिला नवीन तपास कामकाज शिकवत असे, पण त्याचवेळी तो दुहेरी अर्थाचे शब्द अनेक वेळा वापरत असे. त्यानंतर त्याचे धाडस वाढले आणि आरोपीने तिला गाडीत बळजबरीने बसवले आणि वाटेत अश्लील चाळे केले. एक दिवस सतीश हा पोलीस महिलांच्या खोलीत आला आणि तिला पकडून बेडवर ढकलले आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. प्रतिकार केल्यावर आरोपीने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली तसेच नोकरीवरून काढून टाकण्याचा इशारा दिला. वरिष्ठांच्या आदेशावरून आरोपी सतीश याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात बलात्काराचा प्रयत्न, जीवे मारण्याची धमकी देणे या कलमांखाली नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणी आरोपीच्या अटकेची मागणी करत प्रमुख सामाजिक संस्थांच्या कार्यकर्ते यांनी एसपी आणि उपायुक्त यांची भेट घेतली. तसेच सतीशला तत्काळ अटक करावी आणि अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तीला पोलीस सेवेतून काढून टाकावे, अशी मागणी केली आहे.