शुक्रवार, ऑगस्ट 29, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

खळबळजनक! दंगलखोरांनी थेट महिला न्यायाधीशाचे वाहनच पेटवले… आपल्या मुलीसह असा वाचवला जीव…

by Gautam Sancheti
ऑगस्ट 3, 2023 | 5:05 pm
in संमिश्र वार्ता
0
haryana nuh


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मणीपूर पाठोपाठ आता हरियाणामध्ये देखील हिसांचार वाढला आहे. हरियाणामधील नूंह जिल्ह्यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या धार्मिक यात्रेदरम्यान झालेला हिंसाचार आणि तणावानंतर येथे मोठ्या प्रमाणावर निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. नूंहमधील हिंसाचारानंतर पोलिसांनी २६ एफआयआर दाखल केला असून हिंसेच्या व आगीच्या घटनांमध्ये सुमारे १४० वाहने पेटवून देण्यात आली आहेत. त्याबरोबरच ६ जणांचा मृत्यू झाला आहे. इतके नव्हे तर नूंह येथे अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या वाहनावर हल्ला करून ते पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, न्यायाधीश आणि त्यांची तीन वर्षांची मुलगी या हल्ल्यातून थोडक्यात बचावले.

यात्रेवर दगडफेक
नूंह शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये असे सांगण्यात आले की, अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी अंजली जैन यांच्या वाहनावर हल्लेखोरांनी दगडफेक आणि गोळीबार केला. नूंह येथील हिंदू संघटनांनी दरवर्षीप्रमाणे ३१ जुलै रोजी बृजमंडल यात्रा काढण्याची घोषणा केली होती. त्याची परवानगीही प्रशासनाकडून घेण्यात आली होती. सोमवारी ब्रिज मंडळाच्या यात्रेदरम्यान त्यावर दगडफेक करण्यात आली. काही वेळातच दोन समुदायांमध्ये हिंसाचार झाला. शेकडो गाड्या जाळल्या. सायबर पोलिस स्टेशनवरही हल्ला झाला. गोळीबारही झाला. याशिवाय एका मंदिरात शेकडो लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर लोकांना तेथून बाहेर काढण्यात आले. मात्र पोलिसांवरही हल्ले झाले.

मुलीसह बसस्थानकात घुसल्या
नुहानंतर लगेचच सोहना येथेही दगडफेक आणि गोळीबार झाला. यानंतर हिंसाचाराची आग नुहपासून फरीदाबाद-गुरुग्रामपर्यंत पसरली. जिल्ह्यात निमलष्करी दलाच्या एकूण १५ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यामध्ये ७ आरएफ, ४ बीएसएफ, २ सीआरपीएफ, २ आयटीबीपीच्या तुकड्या तैनात आहेत. दरम्यान, हिंसाचारा प्रकरणी आतापर्यंत एकूण ३६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. हिंसाचार व जाळपोळ वाढल्याने अंजली जैन यांना आपल्या चिमुकल्या मुलीसह जीव वाचवून पळून जावे लागले. अंजली जैन व त्यांची मुलगी तसेच त्यांच्या सोबतचे कर्मचारी यांना नूह येथील बसस्थानकावरील कार्यशाळेत आश्रय घ्यावा लागला, त्यानंतर ज्यांच्या ओळखीच्या काही वकिलांनी त्या सर्वांची तेथून सुटका केली.

दगडफेक व गोळीबारही
त्यापुर्वी अंजली, त्यांची तीन वर्षांची मुलगी आणि गनमॅन सियाराम सोमवारी दुपारी त्यांच्या कारमधून औषधे घेण्यासाठी नल्हार येथील एसकेएम मेडिकल कॉलेजमध्ये गेले होते. त्या मेडिकल कॉलेजमधून परतत असताना दिल्ली-अलवर मार्गावरील जुन्या बसस्थानकाजवळ सुमारे १५० दंगलखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. दंगलखोर त्यांच्यावर दगडफेक करत होते. त्यातील काही दगड कारच्या मागील काचेवर आदळल्यानंतर दंगलखोरांनी परिसरात गोळीबार केला. त्यामुळे गाडी रस्त्यावर सोडून जीव वाचवण्यासाठी पळत सुटले. दुसऱ्या दिवशी त्या गाडी पाहायला गेल्या असता दंगलखोरांनी ती गाडी जाळल्याचे समजले. हरियाणातील अनेक शहरे व गावांमध्ये अद्यापही तणावपूर्ण वातावरण आहे.

haryana nuh violence judge vehicle fire burn
stone pelting attack

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

प्रदीप कुरुलकरचे आणखी कारनामे उघड… लवकरच होणार ही टेस्ट….

Next Post

क्रूरपणाचा कळस… सामुहिक बलात्कारानंतर चिमुरडीला वीट भट्टीत जिवंत जाळले… राजस्थान हादरले

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी अनावश्यक खर्चावर लगाम घालावा, जाणून घ्या, शनिवार, ३० ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 29, 2025
crime 88
क्राईम डायरी

घरात शिरून चोरट्यांनी सव्वा सात लाख रूपयाचे दागिने चोरून नेले

ऑगस्ट 29, 2025
IMG 20250829 WA0472 1
संमिश्र वार्ता

राष्ट्रीय क्रीडा दिन…राज्यातील या खेळाडूंना दिले २२ कोटीचे रोख बक्षिसं

ऑगस्ट 29, 2025
वर्षा निवासस्थानी विविध देशातील महावाणिज्य दूतांनी घेतले गणेशाचे दर्शन 1 1024x683 1 e1756473423896
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी विविध देशांच्या ३५ महावाणिज्यदूतांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन

ऑगस्ट 29, 2025
manoj jarange
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पोलिसांनी दिली एक दिवसाची मुदतवाढ…

ऑगस्ट 29, 2025
crime 13
क्राईम डायरी

चांदवड तालुक्यात २२ वर्षीय तरुणाचा हायवा चालवतांना इलेक्ट्रिक तारेचा धक्का लागल्याने मृत्यू

ऑगस्ट 29, 2025
संग्रहित फोटो
संमिश्र वार्ता

मनोज जरांगे पाटील यांना तातडीने अटक करा, ठाकरेंवरही कारवाई करा…गुणरत्न सदावर्तेंची पोलिसांकडे मागणी

ऑगस्ट 29, 2025
IMG 20250829 WA0359 1 scaled e1756465385113
स्थानिक बातम्या

अखेर अंबड एमआयडीसीत या संस्थेने रस्त्यावरील खड्डे बुजवले…वाहनधारकांना दिलासा

ऑगस्ट 29, 2025
Next Post
F2lnjEha0AA9te7

क्रूरपणाचा कळस... सामुहिक बलात्कारानंतर चिमुरडीला वीट भट्टीत जिवंत जाळले... राजस्थान हादरले

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011