इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नूडल्स हे सर्वांनाच आवडतात, विशेषतः लहान मुले नूडल्स खाण्यासाठी हट्ट करतात, परंतु या नूडल्समुळे हरियाणामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. नूडल्स खाल्ल्यामुळे सख्ख्या बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
आईची प्रकृती बिघडली…
पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनीपतच्या पश्चिम रामनगर येथील मायापुरी कॉलनीत राहणाऱ्या भूपेंद्र यांच्या कुटुंबीयांनी रात्री पराठे खाल्ले. त्यानंतर त्यांनी नूडल्स खाल्ले. शेजारच्या दुकानातूनच त्यांनी हे नूडल्स विकत आणले होते. जेवण झाल्यानंतर सर्वजण झोपले. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अचानक भूपेंद्र यांची मुलगी हेमा ( ७ वर्षे) आणि मुलगा तरुण ( ५ वर्षे) यांची प्रकृती गंभीर झाली. नूडल्स खाल्ल्यानंतर दोन्ही मुलांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याचे कळताच आईची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना तात्काळ सोनीपतच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यासोबतच त्यांच्या मोठ्या भावालाही खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात उपचार देण्यात आले.
आईचीही प्रकृती खालावली
रात्रीच्या वेळी नूडल्स खाल्ल्यानंतर दोन्ही मुलांची प्रकृती बिघडली. त्यामुळे या दोन्ही मुलांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण त्यांच्या प्रकृतीत काही सुधारणा होत नव्हती. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. मुलांच्या मृत्यूची बातमी ऐकून त्यांच्या आईला धक्काच बसला. त्यामुळे त्यांची देखील प्रकृती खालवली. त्याची प्रकृती व्यवस्थित आहे. या घटनेची माहिती मिळताच सोनीपतच्या शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पठवण्यात आले. या चौकशीच्या आधारे ठोस कारवाई केली जाईल, असे पोलींसानी सांगितले.