नाशिक – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल जवळील चिंचओहोळ येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाला स्कॅार्पियोमध्ये विदेशी मद्याच्या लाखो रुपये किंमतीचा माल मिळाला. या गाडीतून विदेशी मद्याची वाहतूक करण्यात येत होती. होळी सणासाठी चोरट्या मार्गाने अवैधरित्या परराज्यातील विदेशी दारूची ही वाहतूक होती. पण, राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. दावलेश्वर हरसुलरोड लगत महिंद्रा कंपनीची स्कार्पियो ( एम एच १५ डीसी ५४५५ ) राज्य उत्पादन शुल्क विभागाने अडविल्यानंतर वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये विदेशी बनावटीच्या हजारो बॉटल्स व बियरचे टिन आढळून आले. याप्रकरणी, सर्व मुद्देमाल व गाडी असा ७ लाख ६२ हजार दोनशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व संशयित दादा रामू बुधवार ( २६,रा. काकडपाना,पोस्ट चिंचओहोळ हरसुल तालुका त्र्यंबकेश्वर त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई एस एस देशमुख, व्ही एस कौसडीकर, जी.बी. साबळे, जे. एस. जाखेरे, दुय्यम निरीक्षक पी. बी. ठाकूर, एम. आर. तेलंगे ,यशपाल पाटील, एस. बी. चव्हाण, के. एच. एस. नेहरे, एम. डी .गरुड, व्ही. ए. चव्हाण, जी. आर. तारे, आर. वाय. मुंढे, के. सी. कदम, एस. बी. दिघोळे, राजेंद्र चव्हाणके, राहुल पवार,गोकुळ परदेशी,गोरख आहेर, वीरेंद्र वाघ, धनराज पवार, यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली याप्रकरणी पुढील तपास दुय्यम निरीक्षक पी. बी. ठाकूर करीत आहेत.