पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील हे कोरोना बाधित झाल्यानंतर आता त्यांची नवविवाहीत कन्या अंकिता पाटील-ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अंकिता या पुणे जिल्हा परिषद सदस्य आहेत. अंकिता यांचा विवाह निहार ठाकरे यांच्याशी नुकताच झाला आहे. निहार हे उद्धव ठाकरे यांचे पुतणे आहेत. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र दिवंगत बिंदूमाधव ठाकरे यांच्या त्या सूनबाई आहेत.
निहार आणि अंकात यांचा विवाह सोहळा नुकताच थाटामाटात संपन्न झाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यास हजेरी लावली. निहार हे वकील असून त्यांचे एलएलएम पर्यंत शिक्षण झाले आहे. तर, अंकिता यांनी लंडन स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्स आणि हार्वर्ड विद्यापीठातही शिक्षण घेतले आहे. यानिमित्ताने पाटील आणि ठाकरे परिवार आता स्नेह बंधनात जुळला आहे. हर्षवर्धन पाटील हे दोन दिवसांपूर्वीच कोरोना बाधित झाले आहेत. त्यानंतर आता त्यांची कन्याही कोविड पॉझिटिव्ह झाली आहे. अंकिता यांनी स्वतः ट्विट करुन तशी माहिती दिली आहे.
https://twitter.com/iankitahpatil/status/1477479323514724356?s=20
अंकिता या इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या सदस्या सुद्धा आहेत. निहार हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. निहार यांचे वडील बिंदूमाधव यांचे १९९६ मध्ये अपघाती निधन झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे बंधू जयदेव ठाकरे हे निहार यांचे सख्खे काका आहेत. तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चुलत काका आहेत.
https://twitter.com/Harshvardhanji/status/1476920715106402305?s=20









