मुंबई – बजरंगी भाईजान फेम हर्षाली मल्होत्रा हिला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर तीने या पुरस्काराचे काही फोटो इंस्टाग्राम शेअर केले आहे. त्यात तीने सलमान खान, दिग्दर्शक कबीर खान, कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाबरा आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये, हर्षलीने पुरस्कार स्वीकारताना स्टेजवरील स्वतःचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते ती पुरस्कार स्वीकारताना दिसत आहे.
हर्षाली मल्होत्राने बजरंगी भाईजानमध्ये भारतात हरवलेल्या मुक्या पाकिस्तानी मुलगी ‘मुन्नी’ ची भूमिका केली होती. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी पसंती देत दाद दिली होती. हर्षालीचा जन्म ३ जून २००८ रोजी झाला असून, हर्षालीने २०१५ मध्ये वयाच्या सातव्या वर्षी कबीर खानच्य फिल्म बजरंगी भाईजान मध्ये सलमान खान, करीना कपूर आणि नावाझुद्दिन सिद्दिकी यांच्यासोबत मुख्य भूमिकेद्वारे चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. चित्रपटाच्या ऑडिशन साठी आलेल्या ५००० मुलींमधून हर्षालीची निवड झाली होती. हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे. हर्षालीच्या अभिनयाची सामिक्षांनी प्रशंसा केली होती. तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण नामांकनासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.