इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हरियाणात विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचा नवा ओपिनियन पोल समोर आला आहे. यात काँग्रेसला मोठे यश मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हरियाणात ९० जागांसाठी १ ऑक्टोंबरला मतदान होणार असून ४ ऑक्टोंबरला मतमोजणी होणार आहे. या लोक पोलने केलेल्या या ओपिनियन पोलने वेगवेगळ्या मतदार संघातून थेट ६७ हजार ५०० लोकांचे मत जाणून घेतले. त्यात ९० जागांपैकी काँग्रेसला ५८ ते ६५ जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. तर भाजपला या निवडणुकीत मोठा धक्का बसणार असून २० ते २९ जागेवर भाजपला यश मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर इतर ३ ते ५ जागा मिळू शकतात.
या लोक पोलमध्ये काँग्रेसला ४६ ते ४८ टक्के मिळू शकतात तर भाजपला ३५ ते ३७ टक्के मते मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इतर ७ ते ८ टक्के मतदान होईल असे सर्वेत दाखवण्यात आले आहे.