नाशिक – गिरणा खोरे समुहातील मध्यम प्रकल्प असलेले हरणबारी धरण ओव्हरप्लो झाले आहे. मोसम नदीवर असलेल्या या धरणाची क्षमता ११६६ दशलक्ष घनफुट इतकी आहे. कालच हे धरण ९८ टक्के भरले होते. आज ते पूर्ण भरले आहे. जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये ५४ टक्के साठा असून भावली, वालदेवी ही दोन धरणे अगोदरच ओव्हरफ्लो झाली आहे. तर १२ हून अधिक धरणात ५० टक्के साठा आहे. पण, नागासाक्या, भोजापूर, पुणेगाव व तिसगाव धरणात मात्र सर्वात कमी साठा आहे.