इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावण हा व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावणी सोमवारला तर फार महत्त्व असते. यामुळेच बहुधा ‘हर हर शंभू’ हे गाणं लोकप्रिय झाले आहे. यावर नुकतेच फरमाणी नाझने एक दमदार गाणे देखील रेकॉर्ड केले आहे. मात्र, आता या गाण्यासंदर्भात नवीनच एक वाद जन्माला येतो आहे. ‘हर हर शंभू’ गाण्याची धून कृष्ण भजनातून घेतली आहे. या गाण्याचे संगीत आणि चाल अच्युत गोपींच्या कृष्ण भजन धूनमधून घेतले आहे.
अच्युत गोपींच्या ‘भज मन राधे गोविंद’ हे तुम्ही ऐकले असेल तर तुम्हाला त्यातील राग आणि ‘हर हर शंभू’ या दोन्ही गाण्यात समानता दिसेल. याच्या संगीतात थोडा फरक आहे. या वादानंतर अभिलिप्सा पंड्या आणि जितू शर्माचे हे गाणे यूट्यूब वरून काढून टाकण्यात आले आहे. विशेष म्हणजे अच्युत गोपींना या गाण्यात कसलीही अडचण नव्हती. उलट या धूनवर भगवान शंकरांचे गाणे असल्याचा आनंद असल्याचेही ते म्हणाले आहेत. ‘हर हर शंभू’ गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
https://twitter.com/rose_k01/status/1555081548650913794?s=20&t=ESHUKZC8LvLxpEk5B94VVA
या गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तर अभिलिप्सा पंड्या आणि जीतू शर्मा हे देखील या गाण्याद्वारे खूप लोकप्रिय झाले आहेत. श्रावण महिन्यात भोले बाबाचे हे गाणे सर्वांच्याच पसंतीस उतरले आहे.
Har Har Shambhu Hit Song Controversy