इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जागतिक आनंद दिनानिमित्त वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आनंदी देशांच्या यादीत भारत पाकिस्तानच्याही मागे असल्याचे दिसून आले आहे.
जागतिक आनंद दिवस दरवर्षी २० मार्च रोजी साजरा करण्यात येतो. त्याचदिवशी वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्सदेखील जाहीर करण्यात येतो. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी यंदाची यादी जाहीर करण्यात आली. दरवर्षी २० मार्च रोजी ही यादी जाहीर केली जाते. यंदाही ती जाहीर करण्यात आली असून त्यातून गेल्या वर्षभरात भारतीयांच्या आनंदात फारशी भर पडली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्ककडून ही यादी दाहीर केली जाते. ही यादी तयार करताना वेगवेगळ्या निकषांचा वापर केला जातो. त्याआधारे जगभरातल्या देशांमधल्या परिस्थितीचे मूल्यांकन करून त्यानुसार यादीतील स्थान निश्चित केले जाते. या यादीनुसार जगातील सर्वात आनंदी देशांमध्ये गेल्या सहा वर्षांप्रमाणे याही वर्षी फिनलँडनं अव्वल स्थान पटकावले आहे. त्यापाठोपाठ डेन्मार्क, आईसलँड, इस्रायल, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे, स्वीत्झर्लंड, लक्झेंबर्ग आणि न्यूझीलंड या देशांचा समावेश जगातील सर्वाधिक आनंदी १० देशांमध्ये होतो.
भारत १२०व्या स्थानी
भारताचे स्थान या यादीत पहिल्या शंभरातही नसल्यामुळे त्यावर चर्चा सुरू झाली आहे. १३७ देशांमध्ये भारत या यादीत १२५व्या स्थानी आहे. गेल्या वर्षी हेच स्थान १३६ होते. आशिया खंडातील शेजारी देशांपेक्षा अजूनही भारताचे स्थान खालचे आहे. पाकिस्तान या यादीत १०८व्या स्थानी आहे. त्यापाठोपाठ बांगलादेश ११८व्या स्थानी, श्रीलंका ११२ व्या स्थानी तर नेपाळ थेट पहिल्या शंभरात म्हणजेचच ७८ व्या स्थानी आहे.
Happiness Index India Ranked Pakistan