नवी दिल्ली – हनुमान जयंतीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ११ वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गुजरातमधील मोरबी येथे हनुमानजींच्या १०८ फूट मूर्तीचे अनावरण करतील. #Hanumanji4dham प्रकल्पाचा भाग म्हणून देशभरात चारही दिशांना स्थापना करण्यात येत असलेल्या ४ मूर्तींपैकी ही दुसरी मूर्ती आहे. मोरबी येथील परमपूज्य बापू केशवानंद जी यांच्या आश्रमात पश्चिमेला तिची स्थापना करण्यात आली आहे. या मालिकेतील पहिल्या मूर्तीची स्थापना २०१० मध्ये उत्तरेला शिमला येथे करण्यात आली होती. दक्षिणेकडील रामेश्वरम येथे मूर्तिकाम सुरू करण्यात आले आहे.