नाशिक – हनुमान जयंतीनिमित्त जुने नाशिकमधून येथील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून आयुक्तालयाने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. जूने नाशिकमधील चौक मंडई येथील मारुती मंदिरापासून शनिवारी दुपारी मिरवणुकीला प्रारंभ होईल. मिरवणूक संपेपर्यंत बागवानपुरा येथून कुठलीही वाहने चौक मंडईकडे न जाता अमरधाम रस्त्याने पुढे जातील. तसेच सारडा सर्कलमार्गे शालिमारहून पुढे सीबीएस व्हाया डावीकडे शरणपूर रोडने कॅनडा कॉर्नर अशी जाणार असल्याचे या अधिसूचनेत म्हटले आहे. मिरवणुकीसाठी महत्वाच्या १२ ठिकाणी बॅरिकेडिंग पॉईंट निश्चित करण्यात आले आहेत. या पॅाइंटवर खाकी गणवेशातील एकूण १२ पोलीस, १७ वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त नियुक्त असणार आहे. हे निर्बंध पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन बंब, शववाहिकेला लागू राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
असा असेल मार्ग
पंचवटीकडून येणारी वाहने मखमलाबाद नाका येथून थेट रामवाडीतून हनुमानवाडी रस्त्याने जुना गंगापूर नाक्याकडे रवाना होतील. सीबीएसकडून पंचवटीकडे जाणारी वाहतूक मेहेर सिग्नल, अशोक स्तंभावरून पशवैद्यकीय दवाखान्यापासून घारपुरे घाटाकडून मखमलाबाद नाकामार्गे पुढे रवाना होतील. दुधबाजार, शाहिद अब्दुल हमीद चौकातून भद्रकाली, बादशाही कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉईंट, रेडक्रॉस सिग्नल, एमजी रोडवरून अशोक स्तंभमार्गे रविवार कारंजा, मालेगाव स्टँडवरून मिरवणूक रामकुंडावर जाणार आहे.