त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून श्री हनुमानाच्या जन्मस्थानावरुन सुरु असलेला वाद संपुष्टात आला असुन विविध पुराणांच्या आधारे अंजंनेरी हेच जन्मस्थान असल्याचे शिक्कामोर्तब झाल्याने अंजंनेरी येथील अशोकबाबा यांच्या आश्रमात आज ऋणनिर्देश व विजयाचा जल्लोष करण्यात आला.
कर्नाटकामधील स्वामीजी गोविंदानंद सरस्वती यांनी त्र्यंबकेश्वर येथे येवुन श्री हनुमानाचे जन्मस्थानाला आव्हान दिले होते. त्यांचे म्हणण्यानुसार श्री हनुमानाचे जन्मस्थान जन्मस्थान हे अंजंनेरी नसुन कर्नाटक मधील किश्कींधा होय. यावरुन जिल्ह्यातील वातावरण ढवळुन निघाले होते. जिल्ह्यातील भाविकांच्या भावना दुखावल्याने भाविक संतप्त झाले होते. त्र्यंबकेश्वर सह अंजंनेरी परिसरातील साधुमहंत व ग्रामस्थांनी निषेध म्हणुन अंजंनेरी फाट्यावर रस्तारोको केला होता.
यानंतर नाशिकला झालेली धर्मपरिषद वादविवादाने गाजल्याने यात निर्णय होऊ शकला नाही. यानिमित्ताने अयोध्या निवासी पंतप्रधान मोदीजींना ज्यांनी रामजन्मभुमि पुजनाचा प्रधान संकल्प सांगितला होता असे वेदोनारायण गंगाधरशास्त्री पाठक यांना पुराणातील दाखले दाखविण्यात आले. त्यांनी ते बघुन अंजंनेरी हिच हनुमंतरायाची जन्मभुमि असल्याचे स्पष्ट केले. जन्मस्थानावर शिक्कामोर्तब झाल्याने ज्यानी याकामी सक्रीय सहभाग नोंदवला अशा सर्वांचा ऋणनिर्देश सोहळा व विजयाचा जल्लोष आज अंजंनेरी येथे करण्यात आला.
यावेळी पीठाधीश्वर श्रीराम शक्तीपीठ संस्थान राष्ट्रसंत अनंत विभुषीत श्री श्री १००८ महामण्डलेश्वर स्वामी सोमेश्वरानन्द सरस्वतीजी महाराज (पंचायती अखाडा श्री निरजंनी ), श्रीमहंत सुधीरदास महाराज, महंत भक्तीचरणदास, महंत उदयगिरी, महंत शिवानंद सरस्वती तथा भगवान बाबा, ब्रह्मचारी महाराज तथा अशोक बाबा, ठाणापती दुर्गानंद ब्रह्मचारी, ठाणापती पर्वतगिरी, ठाणापती बृहस्पतीगिरी, महंत पिनाकेश्वर महाराज, ठाणापती रतनगिरीजी, ठाणापती अभयानंद ब्रह्मचारी, ठाणापती शुक्रापुरी, दिगंबर अजयपुरी, महंत राकेशपुरी, ब्रह्मचारी राजु महाराज, खडेश्वरगिरी, लखनगिरी, नारायणगिरी, रामानंद सरस्वती, दत्तगिरीजी, परमानंद भारती, भिमाशंकरगिरी, स्वामी श्रीकंठानंद, स्वामी विश्वरुपानंद, बबनगिरी, श्रीनाथानंद सरस्वती, सिध्देश्वरानंद सरस्वती, सुदर्शनानंद सरस्वती, रामानंद सरस्वती, राहुल रनाळकर, जेष्ठ नेते मधुकर लांडे, संपत सकाळे, लोकनेते सुरेश गंगापुत्र, कमळु कडाळी, किरण चौधरी, राजु बदादे आदिंसह अंजंनेरी ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रमुख अतिथींचे ढोलताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. तसेच सर्व साधुसंताचा यथायोग्य सत्कार करण्यात आला. महंत पिनाकेश्वरगिरी यांनी प्रास्तविक सादर केले. सोमेश्वरानंद सरस्वती महाराज, भक्तीचरणदास महाराज, श्रीमहंत सुधीरदास महाराज यांनी घडलेल्या घडामोडी सांगितल्या. माजी जि.प. सदस्य कमळु कडाळी, स्वामी श्रीकंठानंद आदिंनी मनोगत व्यक्त केले. हनुमान जन्मस्थळाच्या विकासाकरता निधी आणण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले. शेवटी मिठाई वाटप करण्यात आली.