नाशिक – हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे नवनिर्वाचित इंडिपेंडंट डायरेक्टर दिपक शिंदे यांनी नाशिक एचएएल कारखान्यास भेट दिली. यावेळी संरक्षण उत्पादन क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या लघु व मध्यम उद्योग प्रतिनिधींनी दिपक शिंदे यांची भेट घेऊन ईंडिजीनायझेशन व विविध उत्पादनांविषयी चर्चा केली. प्रथमच महाराष्ट्रातील डायरेक्टर नियुक्त झाल्यामुळे महाराष्ट्रातील उद्योजकांना सर्वतोपरी मदत मिळेल अशी आशा आहे. भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांच्या नेतृत्वाखालील उद्योजकांच्या शिष्टमंडळाने शिंदे यांचे स्वागत करुन नाशिक येथील उद्योग क्षमतांचे सादरीकरण केले. नाशिक येथे डिफेन्स ईन्नोव्हेशन हब स्थापन होण्याच्या दृष्टीने ही भेट खुप उपयोगी ठरेल.
बंगलुरू व नाशिक येथील व इतर एचएएल डिव्हजन मधून स्टार्ट अप व नाविन्यपूर्ण उत्पादनांसाठी आवश्यक ती मदत देण्याची ग्वाही शिंदे यांनी दिली. लवकरच नवीन काही प्रोजेक्ट नाशिक युनिटला देऊ असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी युवराज वडजे,सचीन तरटे, आनंद सुर्यवंशी,सुहास कुलकर्णी, विलास बत्तीसे, किरण सुर्यवंशी व गौरव आहेर आदी उद्योजक उपस्थित होते.