ओझर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- येथील एचएएल कामगार संघटनेच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी ९३.४२ टक्के मतदान झाले. एकूण ३१ जागांसाठी २८१२ पैकी २६२७ कामगारांनी आपला हक्क बजावला.रविवारी २० एप्रिल रोजी सकाळी ६.३० वाजेपासून मतमोजणीस सुरवात होणार असून साधारण दुपार पर्यंत पदाधिकारी जागांसाठी निकाल लागण्याचे अपेक्षित आहे.
यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी आपला जागृती पॅनल आणि श्री श्रमशक्ती पॅनल यांच्यात थेट लढत झाली.यात सरचिटणीस आणि अध्यक्षपदासाठी मोठी लढत होणार आहे. विद्यमान सरचिटणीस संजय कुटे यांच्यासमोर सचिन ढोमसे यांनी तर अनिल मंडलिक यांच्या समोर गिरीश वलवे यांनी कडवे आव्हान उभे केले आहे.मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून पहिल्या अडीच तासातच सुमारे दोन हजार कामगारांनी आपला हक्क बजावला. या मतदान वेगामुळे दोन्ही पॅनलच्या उमेदवारांना कल बांधणे अवघड झाले आहे. त्यामुळेच सत्तांतर होते की सत्ता राखली जाते या कडे तमाम कामगारांचे लक्ष्य लागून आहे.