शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

संरक्षण मंत्रालयाने एचएएलबरोबर केले ६२ हजार ७०० कोटी रुपयांचे दोन करार….हे १५६ लढाऊ हेलिकॉप्टर पुरवणार

by Gautam Sancheti
मार्च 29, 2025 | 4:40 pm
in संमिश्र वार्ता
0
image001K03S

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- संरक्षण मंत्रालयाने १५६ हलक्या वजनाचे लढाऊ ‘प्रचंड’ हेलिकॉप्टर (एलसीएच) पुरवण्यासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) सोबत दोन करार केले. यावेळी कर वगळता ६२,७०० कोटी रुपयांचा व्यवहार करण्‍याचा करार केला. तसेच प्रशिक्षण आणि इतर संबंधित उपकरणे या करारानुसार देण्‍यात येणार आहेत. पहिला करार भारतीय हवाई दलाला (आयएएफ) 66 एलसीएच पुरवण्यासाठी आहे आणि दुसरा करार भारतीय लष्कराला 90 एलसीएच पुरवण्यासाठी करण्‍यात आला आहे.

या हेलिकॉप्टरचा पुरवठा तिसऱ्या वर्षापासून सुरू होईल आणि पुढील पाच वर्षांत मागणी पूर्ण केली जाईल. या करारांमुळे जास्त उंचीवर सशस्त्र दलांची लढाऊ क्षमता वाढेल. एलसीएच हे भारतातील पहिले स्वदेशी डिझाइन केलेले आणि विकसित केलेले लढाऊ हेलिकॉप्टर आहे. या हेलिकॉप्टरमध्‍ये ५००० मीटरपेक्षा जास्त उंचीवर काम करण्याची क्षमता आहे.

संरक्षण मंत्रालयाने आयएएफ आणि भारतीय नौदलाच्या वैमानिकांना हवेतून हवेत इंधन भरण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी एका फ्लाइट रिफ्युएलिंग एअरक्राफ्ट (एफआरए) च्या ‘वेट लीजिंगसाठी मेट्रिया मॅनेजमेंट’ बरोबर करार केला आहे. मेट्रिया सहा महिन्यांत एफआरए (केसी135 एअरक्राफ्ट) प्रदान करणार आहे. अशा प्रकारे आयएएफने वेट भाडेतत्वावर घेतलेले हे पहिले एफआरए आहे.

या तीन करारांवर स्वाक्षरी केल्यानंतर २०२४-२५ दरम्यान संरक्षण मंत्रालयाने स्वाक्षरी केलेल्या एकूण करारांची संख्या १९३ झाली आहे. त्यांचे एकूण करार मूल्य २,०९,०५० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आतापर्यंतचे हे मूल्य सर्वाधिक आहे. इतकेच नाही तर, मागील सर्वोच्च आकड्याच्या जवळजवळ दुप्पट आहे. यापैकी, देशांतर्गत उद्योगांबरोबर केलेले करार १७७ (९२ टक्के) आहेत ज्यांचे करार मूल्य १,६८,९२२ कोटी रुपये (८१ टक्के) आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धुणी भांडी करण्यासाठी घरात येणा-या मोलकरणीने महिलेची पोत चोरून नेली

Next Post

खड्ड्यांच्या तक्रारीसाठी आता ही नवीन ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली….

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Maha Gov logo 07 1 1024x512 1

खड्ड्यांच्या तक्रारीसाठी आता ही नवीन ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली….

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011