इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) तयार केलेल्या या सुपरसॉनिक ट्रेनर विमानावरील हनुमानाच्या चित्राने बंगळुरू येथील एअरो शोची सोमवारी सर्वत्र चर्चा होती. काहींनी स्वदेशीचा पुरस्कार करत हनुमानाच्या चित्राचे स्वागत केले तर काहींनी त्यावर टीका केली. या पार्श्वभूमीवर नवीन वाद रंगत असल्याचे लक्षात येताच मंगळवारी त्या विमानावरील हनुमानाचे चित्र काढण्यात आले.
एचएएलने एअरशोमध्ये प्रदर्शित केलेल्या एचएलएफटी-४२ विमानाच्या मॉडेलवरील हनुमानाचा फोटो गायब झाला आहे. एचएएलने एअरो शोमध्ये आधुनिक लढाऊ ट्रेनर विमान एचएलएफटी-४२ प्रदर्शित केले. या विमानाच्या शेपटीवर हनुमानाचे चित्र होते. मात्र, लगेच दुसऱ्या दिवशी या विमानावरील चित्र हटविण्यात आले आहे. बंगळुरुमध्ये चौदाव्या एअरो शोचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामधील हनुमानाचे चित्र असणारे विमान चर्चेत आले होते. परंतु, आता यावरील हनुमानाचे चित्र गायब झाल्याने नवीन चर्चा सुरू झाली आहे.
पीयूष गोयल यांनी केले होते ट्वीट
एचएएलचे सुपरसॉनिक ट्रेनर लढाऊ विमान हे भारतातील पहिले सुपरसॉनिक ट्रेनर विमान आहे. याचे मॉडेल तयार असून ते एअरो इंडिया शोमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. हे विमान तयार झाल्यानंतर भारतीय लढाऊ वैमानिक त्यावर पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने उडवण्याचे प्रशिक्षण घेतील. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी ट्विटरवर विमानाचा फोटो पोस्ट करत,‘वादळ येत आहे. जय बजरंगबली. एरो इंडिया शोमध्ये HAL चे HLFT-42’ असे म्हटले होते.
https://twitter.com/PiyushGoyal/status/1625136882979053568?s=20&t=YFc-dfq1KnKs-j_pZDBi9w
देशविदेशातील हवाई शस्त्रांचे प्रदर्शन
आशियातील सर्वात मोठ्या एअर शोचे भारतात आयोजन करण्यात आले आहे. कर्नाटकची राजधानी बंगळुरु येथे पंतप्रदान मोदींच्या हस्ते या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमात देशविदेशातील हवाई शस्त्रांचे प्रदर्शन आणि हवाई कसरती पाहायला मिळत आहेत. १७ फेब्रुवारीपर्यंत या एअर शो असून यात ऐंशीहून अधिक देश सामील झाले आहेत.
https://twitter.com/ANI/status/1625388192403976192?s=20&t=uU7pcdDcAcEcg6G12VPb8g
HAL Fighter Aircraft Hanuman Sticker Removed