नाशिक – नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित, मेसन ट्रेडर्स व मेसन डेव्हलपर्स पुरस्कृत हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीच्या १९ वर्षांखालील स्पर्धेचे अंतिम फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे. द्वारका क्रिकेट क्लब व नाशिक क्रिकेट अकादमी या संघांनी महात्मा नगर क्रिकेट मैदानावर झालेले आपापले उपांत्य फेरीचे सामने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली आहे. या २०२१-२२ हंगामातील हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी ( १९ वर्षांखालील ) स्पर्धेत दहा गटातील ३० संघात झालेल्या एकूण ३७ साखळी व बाद फेरीच्या सामन्यांनंतर वरील दोन संघ विजेतेपदासाठी खेळतील. स्पर्धेत आतापर्यंत एन डी सी ए मॉर्निंगचा सलामीवीर प्रितम सरकार फलंदाजीत ४ सामन्यातील २३५ धावांसह अग्रस्थानी आहे, तर गोलंदाजीत देखील उपउपांत्य फेरीपर्यंत मजल मारलेल्या एनडीसीए मॉर्निंगचाच ऑफ स्पिनर शुभम वाघ ४ सामन्यातील १५ बळींसह अग्रस्थानी आहे.
उपांत्य फेरीचे सामने : संक्षिप्त धावफलक व निकाल :
१ – नाशिक जिमखाना वि. द्वारका क्रिकेट अकादमी : नाशिक जिमखाना ने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली.
नाशिक जिमखाना सर्वबाद १३५ ( ४३.२ षटके ) – आयुष हवालदार २९, यश पगार २१. स्मित नाथवानी ४ तर समकीत सुराणा व कुणाल त्रिपाठी प्रत्येकी ३ बळी. वि. द्वारका क्रिकेट अकादमी – ३ बाद १४०( १८ षटके ) – समकीत सुराणा नाबाद ४०, मुस्तांसिर काचवाला ३१ , हर्ष शार्दुल २४, मोहम्मद ट्रंकवाला २०. हुजैफ शेख ३ बळी द्वारका क्रिकेट अकादमी ७ गडी राखून विजयी.
२ – एन एस एफ ए वि नासिक क्रिकेट अकादमी : एन एस एफ ए ने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली.
एन एस एफ ए – सर्वबाद ११३ ( ४१.३ षटके ) – वेदांत पूरकर व पार्थ ताथेड प्रत्येकी २९ . रोहन शेडगे ४ बळी.
वि. नासिक क्रिकेट अकादमी – ५ बाद ११४ ( २२.५ षटके ) – समर्थ देशमुख ३४, अनिकेत सिंग ३० . नीलकंठ तनपुरे ३ तर अभिराज नेहरकर २ बळी.
नाशिक क्रिकेट अकादमी ५ गडी राखून विजयी.