बोगोटा (हैती) – अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून राष्ट्राध्यक्ष ज्वनेल मौसे यांची गेल्या आठवड्यात हत्या केली. या क्रूर घटनेने हैतीसह जगातील सर्व देश आणि नेत्यांना धक्का बसला. हल्ल्यादरम्यान राष्ट्रपतींच्या पत्नीलाही गोळ्या घालण्यात आल्या परंतु त्यांचे प्राण वाचले. ज्वेलन मौसे यांच्या हत्येप्रकरणी महत्त्वपूर्ण धागेदोरे सापडले आहेत. या हत्येचा मुख्य सूत्रधार हा अमेरिकन इमॅन्युएल सेनॉन हा ६३ वर्षीय डॉक्टर आहे. त्याला अटक करण्यात आली असून त्यानेच या हत्येची जबाबदारी फ्लोरिडाच्या गटाला दिली होती. यासाठी त्याने काही कोलंबियन लोकांचीही मदत घेतली होती.
हैती हा देश कॅरिबियन समुद्रातील हिस्पॅनियोला बेटाच्या पश्चिम भागात आहे. हैतीच्या पूर्वेला डॉमिनिकन प्रजासत्ताक हा देश असून हैती ग्रेटर अँटिल्सचा भाग आहे. पोर्ट औ प्रिन्स ही हैतीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हैती या देशाचे क्षेत्रफळ २७, ७५० वर्ग किलोमीटर इतके असून केवळ ११ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या कॅरिबियन देशात राजकीय अस्थिरता वाढत आहे. हिंसाचार वाढत असताना राष्ट्रप्रमुखांचीही हत्या करण्यात आली.
हैतीचे पोलिस प्रमुख लिओन चार्ल्स यांनी सांगितले की, इमॅन्युएल खासगी विमानाने जुनमध्ये येथे आला होता. त्यानंतर त्याने संपूर्ण कट रचला आणि त्यांनी येथील विरोधी लोकांशी संपर्क साधला होता. या संपूर्ण योजनेत हैतीच्या सुरक्षा दलाची कोणतीही भूमिका नसल्याचेही तपास यंत्रणांनी सांगितले आहे.
अध्यक्षांवर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मास्टरमाइंड इमॅन्युएल सेननच्या संबंधात अमेरिकेची कायदा अंमलबजावणी व गुप्तहेर संस्थाही आता चौकशी करत आहेत. मास्टरमाईंड डॉ. इमॅन्युएल सेनन देखील खूप महत्वाकांक्षी आहे. इमॅन्युएलने एकदा या देशाचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली. यासंदर्भात त्याने एक व्हिडिओ यूट्यूबवर अपलोडही केला होता. हैती येथे अमेरिकन सैन्य पाठविण्याच्या निर्णयाला अद्याप नकार देण्यात आलेला नाही. परंतु व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव जेन सासाकी म्हणाले की, हैतीचे काळजीवाहू पंतप्रधान क्लॉड जोसेफ यांच्या सैन्याने पाठविण्याच्या प्रस्तावाचा आढावा घेण्यात येत आहे.