पुणे – तरूण मुलगा असो की मुलगी, प्रत्येकालाच आपले केस प्रिय असतात. विशेषत : प्रत्येक मुलगी सुंदर लांब केसांची स्वप्न पाहते, परंतु केसांबाबत अनवधानाने केलेल्या काही चुका आपले स्वप्न पूर्ण होऊ देत नाहीत. केसांशी संबंधित काही चुका झाल्यास आपले केस सुंदर आणि लांब होण्याऐवजी वेगाने गळू लागतात. केसांशी संबंधित अशा काही चुकांबद्दल आपण जाणून घेऊ या…
केस विंचरताना (कॉम्बिंग करताना)
केसांच्या मुळापासून कोम्बिंग सुरू करणे टाळा, कारण केसांच्या मुळापासून विंचरव याला सुरवात केली तर ते कमकुवत होऊन तुटण्याची शक्यता असू शकते. असे केल्याने, बरीच गुंतागुंत होऊ केस खालच्या भागात गोळा होऊ लागतात, तसेच टाळूवर ताण येतो आणि केस तुटणे सुरू होते.
योग्य आहार व तेलांचा वापर
केस गळती थांबवण्यासाठी आहारात योग्य घटकांचा समावेश असावा. तसेच उत्तम प्रतीचे तेल केसांना लावावे. नैसर्गिक घरगुती उपचारांमुळे शरीरात लोहाची कमतरता दूर होईल, काही दिवसांतच फरक दिसून येईल.
ओले केस
आपण ओल्या केसांना कंगवा करत असाल तर त्वरित ही सवय थांबवा. कारण असे केल्याने केस कमकुवत होतात आणि ते खराब होण्याची अधिक शक्यता असते. कोंबिंग करण्यापूर्वी, आपण आपले ओले केस वारा किंवा सूर्यप्रकाशासारख्या नैसर्गिक मार्गाने पूर्णपणे कोरडे करा आणि त्यानंतरच त्यांना कंगवा करावा.
घाईघाईने कोम्बिंग
घाईघाईने कंगवा केल्याने केस अधिक वेगाने गळतात तसेच त्याची मुळे कमकुवत होतात. केसांची मुळे कमकुवत झाल्यामुळे केसाला फाटे फुटू लागतात. कोंबिंग करताना हलके हातांनी कंगवा फिरवा. त्याकरिता प्लास्टिकऐवजी लाकडी कंगवा वापरा.
शाम्पू, कंडिशनरचा वापर
केसांची निगा राखण्यासाठी शाम्पू, हेअर पॅक, कंडिशनर आणि सीरम यासारख्या घटकाच्या वापराच्या वेळी काही लोक केसांना कंगवा लावायला सुरवात करतात. त्यांना वाटते की ही केसांची निगा राखणारी उत्पादने केसांमध्ये समान रीतीने लागू होतील, परंतु असे करण्याने केस खूप ओले होतात आणि गुंतागुंत होऊन तुटू लागतात.
—
(सूचना : केस गळतीची समस्या ही सार्वत्रिक असून यासाठी कोणत्याही गोष्टीचा उपयोग करण्यापूर्वी केस तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.)