मुंबई – राज्यात येत्या २ दिवसात वीजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि गारपीटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे की, महाराष्ट्राच्या अनेक भागात वादळी वारे, गारपीट, वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. वातावरणातील बदलांमुळे हा अवकाळी पाऊस होणार आहे. त्यामुळे आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1388412483765825536