इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – येथील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाशी संबंधित एक व्हडिओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये न्यायालयीन आयुक्तांनी सर्वेक्षणात उल्लेख केलेल्या शिवलिंगासारख्या गोल आकारासह जवळपास सर्व चिन्ह दिसून येत आहेत. सोमवारी सायंकाळी गहाळ झालेल्या व्हिडिओमध्ये ज्ञानवापी मशिजीच्या वुजूखाना, त्याच्या चारही बाजूला वादी आणि प्रतिवादी पक्षाचे वकील आणि न्यायालयाने नियुक्त केलेलेल्या आयुक्तांचे पथक दिसून येत आहे.
मशिदीच्या तिन्ही घुमटाच्या खाली त्रिशुळासारख्या आकाराचा उल्लेख सर्वेक्षणाच्या अहवालात करण्यात आला होता. परंतु व्हिडिओमध्ये हे आकार दिसून येत नाहीत. मशिदीच्या भिंतींवर जवळपास एक डझन ठिकाणी कोरलेल्या त्रिशुळासह फुले दिसत आहेत. व्हिडिओमध्ये नगरपालिकेचे कर्मचारी वुजूखानामधील पाणी काढताना दिसत आहेत. पाणी काढल्यानंतर काळ्या पाषाणाच्या शिवलिंगाचा आकार दिसत आहे.
आयुक्तांनी सर्वेक्षणात शिवलिंगाची उंची २.५ फूट आणि व्यास चार फूट नमूद केले आहे. मशिदीच्या तळघरात जुन्या दगडांनी बनवलेले तीन खांब दिसले आहेत. त्यावर सनातन संस्कृतीचे प्रतीकचिन्हे कोरलेली आहेत. व्हिडिओमध्ये अशी चिन्हे मशिदीच्या पश्चिम आणि पूर्व भिंतींवरसुद्धा आहेत.
हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन म्हणाले, की न्यायलयीन आयोगाच्या कार्यवाहीचा व्हिडिओ कसा गहाळ झाला, हे देवालाच ठाऊक. हा व्हिडिओ मी अनेक वाहिन्यांवर पाहिल्यावर स्तब्ध झालो. हे योग्य नाही. सोमवारी वादी महिलांनी व्हिडिओ आणि फोटो घेतले होते. मंगळवारी सर्व एका लिफाफ्यात सुपूर्द करण्यात आले. मुस्लिम पक्षाचे वकील अभयनाथ यादव म्हणाले, की कार्यवाहीचा व्हिडिओ गहाळ होणे दुर्दैवी आहे. ही कृती न्यायालयाच्या आदेशाचा अवमानाच्या श्रेणीत येते. यावर मंगळवारी आक्षेप घेतला जाईल.
https://twitter.com/ShivKum60592848/status/1531324365010108417?s=20&t=Vg3N1G4mTkGM8HHFZyHNBg