पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आषाढ महिन्यातील पौर्णिमेला दरवर्षी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी गुरूची पूजा केली जाते. गुरूच आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचण्याचा तसेच आयुष्य जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात असे मानले जात असल्याने हिंदू धर्मात गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. यावर्षी गुरुपौर्णिमा १३ जुलै २०२२ रोजी बुधवारी साजरी केली जाणार असून या गुरुपौर्णिमेला चार अतिशय शुभ राजयोग तयार होत आहेत.
आषाढ पौर्णिमा हा गुरु वेद व्यास यांचा जन्मदिवस असून हा सण त्यांना समर्पित केला जातो. महर्षी वेद व्यास यांनी वेद आणि पुराणांची रचना केली आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास खूप प्रभावी फळ मिळते. यंदा राजयोग तयार झाल्याने गुरुपौर्णिमेचे महत्त्व वाढले आहे. या दिवशी गुरु, मंगळ, बुध आणि शनि शुभ स्थितीत असणार आहेत. या चार ग्रहांच्या स्थितीमुळे शशा, रुचक, भंग आणि हंस असे चार राजयोग तयार होत आहेत. याशिवाय बुधादित्य योगही यादिवशी तयार होत असून शुक्रदेखील अनुकूल आहे. त्यामुळे यंदाची गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे.
मुहूर्त असा
आषाढ महिन्याची पौर्णिमा पहाटे चार वाजेपासून सुरु होणार आहे. तर पौर्णिमा तिथी १२.०६ वाजता समाप्त होणार आहे.
अशी करा पूजा
धार्मिक मान्यतेनुसार गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. ही पूजा अतिशय फलदायी मानली जाते. यादिवशी माता लक्ष्मीची पूजाही केली जाते. पंचामृत, तुळशीची डाळ अर्पण करुन पूजा केली जाते. तसेच लक्ष्मीला खीर अर्पण केल्याने तिची विशेष कृपा प्राप्त होते असे मानले जाते. तसेच गायीलाही चारा दिल्याने अनेक प्रकारचे दोष दूर होतात असे मानले जाते.
Gurupaurnima Muhurta and Puja Rajyog details