नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजधानी दिल्लीहून जवळच असलेल्या गुरुग्राम परिसरात झोपडपट्टीत गांजा, चरस आणि ड्रग्सची अवैधरित्या विक्री होत असल्याचे खबर पोलिसांना लागली होती, परंतु अशा प्रकारची कोणतीही साहित्य पोलिसांना आढळून आले नाही. मात्र एका झोपडी मध्ये एक बॅग तथा पेटीमध्ये मोठा ऐवज सापडला ते बघून पोलीस देखील चक्रावून गेले आहेत.
सापळा रचून धाड…
केल्या काही दिवसांपासून दिल्ली पोलिसांनी अवैध धंद्याविरुद्ध मोहिम उघडले आहे. गुडगाव भागात सेक्टर १० मधील परिसरात एका खासगी शाळेजवळील झोपडपट्टीत काही तरूण अवैधपणे नशेचे पदार्थ विकतात अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी परवानगी पोलिसांनी सापळा रचत याठिकाणी धाड टाकली. त्यावेळी पोलिसांना ड्रग्स, गांजा काही सापडले नाही परंतु एका झोपडीत पोलिसांना मोठा खजिना हाती लागला.
रोकड व दागिने कुठून आणले
एका घरात पोलिसांना बॅग आढळली. ही बॅग पोलिसांनी उघडली असता त्यात चांदीचे दागिने आणि मोठी रोकड सापडली. चांदीच्या दागिन्यांचे वजन केले असता ते ४ किलो ३७० ग्रॅम असल्याचे आढळले. त्यानंतर नोटा मोजण्याच्या मशीनने पैसे मोजले असता १२ लाख ८० हजार रोकड सापडली. कॅश रक्कम आणि दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. आता नागरिकां नोटीस देऊन इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड आणि दागिने कुठून आणले याची चौकशी पोलीस करत आहेत. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे. मात्र या प्रकरणामुळे खळबळ उडाली असून त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.