नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रियकर आपल्या प्रेयसीसाठी काहीही करायला तयार असतो. अगदी आकाशातील चंद्र तारे तोडून आणण्याची त्याची तयारी असते, असे म्हटले जाते. आपले प्रेयसीवर किती प्रेम आहे, हे दाखविण्यासाठी तो जीवाचे रान करतो. तिच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट घेतो. तिचा वाढदिवस असेल तर मग काही विचारायलाच नको, तिला आवडणाऱ्या आणि तिच्या ईच्छेनुसार सर्व गोष्टी तिच्यासाठी करत असतो, मात्र काही लोभी तरुणी तथा प्रेयसी या प्रियकराला चांगलेच छळतात आणि स्वार्थापायी त्याच्याकडून सर्व प्रकारचा लाभ घेतात. या प्रकारातून मग ताणतणाव निर्माण होतो काही वेळा तर प्रियकर जीव देण्याचाही प्रयत्न करतो, अशा प्रकारच्या घटना समाजात घडताना दिसून येतात, अशीच एक घटना नवी दिल्ली परिसरात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
गेस्ट हाऊसमध्ये वाढदिवस
एका इसमाने घरी बायको व मुले वाट त्याची पाहत असताना गुरुग्राममधील गेस्ट हाऊसमध्ये प्रेयसीचा वाढदिवस साजरा केला, इकडे घरची मंडळी तो घरी आला नाही म्हणून काळजीत पडली, दुसऱ्या दिवशी गेस्ट हाऊसच्या रूममधूनच इन्स्टाग्रामवर लाइव्ह होत त्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. कारण त्याची प्रेयसी तथा कथित तरुणी ही त्याला अनेक महिन्यांपासून त्याला व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल करत होती, असा आरोप त्या इसमाच्या कुटुंबीयांनी केला असून तरुणीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने गळफास लावण्यापूर्वी ती महिला खोलीतून निघून गेली होती. पोलीसांनी गेस्ट हाऊसमधून सीसीटीव्ही फुटेज मिळवत इतर महत्त्वाचे पुरावे गोळा करत असल्याचे सांगितले. दरम्यान, अशा प्रकारे लाइव्ह आत्महत्येची धक्कादायक घटनेची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.
म्हणून केली आत्महत्या
मूळ हिसार येथील रहिवासी दोन मुलांचा बाप असलेल्या विक्रम (३५) याची फार्माकोलॉजीचा कोर्स करत असताना हिमाचल प्रदेश (मंडी) मधील एका वीस वर्षीय तरुणी सोबत ओळख झाली होती, या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले, असे सांगण्यात येते. ही तरुणी त्याच्या श्रीमंतीचा फायदा घेऊन त्याच्याकडून सारखे पैसे उकळत असे, तसेच त्याला ब्लॅकमेल करीत असे. एक दिवस विक्रम हा तरुणीसह एका गेस्ट हाऊसमध्ये गेला होता. विक्रमने आत्महत्या केली, तेव्हा महाविद्यालयीन विद्यार्थिनी रूममध्येच होती, असा दावा विक्रमच्या पत्नीने केला आहे. गेस्ट हाऊसमध्ये पोहोचल्यावर तरुणीने तिचा वाढदिवस साजरा करत असल्याचे त्याने त्याच्या कुटुंबाला लाईव्ह दाखवण्यासाठी विक्रमला व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडले. त्यामुळे विक्रम चांगलाच घाबरून गेला होता त्यातच ती एका जुन्या व्हिडीओद्वारे पतीला ब्लॅकमेल करत होती. त्याने तिला आधीच २० लाख रुपये दिले होते, आणि आता ती आणखी मागत होती. त्यामुळेच विक्रम ने आत्महत्या केली असा त्याच्या पत्नीचा आरोप आहे पोलिसांनी तिचा फोन तपासल्यावर सत्य बाहेर येईल, असेही त्याच्या पत्नीला वाटते.
Gurugram Crime Girl Friend Birthday Celebration Boy Friend
Suicide