गुरुपुष्यामृत योग
यावर्षीचा शेवटचा गुरुपुष्यामृत योग 25 नोव्हेंबरला आहे. ज्या गुरुवारचे चंद्र नक्षत्र पुष्य नक्षत्र असते. त्यादिवशी गुरुपुष्यामृत योग असतो. यालाच सर्वार्थसिद्धी योग किंवा अमृतयोग असे म्हटले जाते. ज्योतिष शास्त्र मान्यतेनुसार 27 नक्षत्रांपैकी अन्य महत्त्वाच्या नक्षत्रांप्रमाणेच पुष्य नक्षत्राला देखील नक्षत्रराज असे संबोधले आहे.

व्हॉटसअॅप – 9373913484
पुष्य याचा अर्थ चौफेर प्रगती होणे, वाढ होणे. पुष्य नक्षत्र हे नक्षत्र रांगेतील आठवे नक्षत्र आहे. ते कर्क राशीत येते. तसेच ते चतुष्पाद नक्षत्र आहे. या नक्षत्रावर मंदिर निर्माण, मूर्ती प्रतिष्ठापना, प्राणप्रतिष्ठा, नूतन वास्तू खरेदी-प्रवेश, सुवर्ण खरेदी, रत्न खरेदी, नूतन संकल्प करतात.
पुष्य नक्षत्राच्या चार चरणांपैकी पहिल्या चरणावर रवी, दुसऱ्यावर बुध, तिसऱ्यावर शुक्र, चौथ्यावर मंगळ यांचा प्रभाव असतो. पुष्य नक्षत्र हे अग्नी तत्त्वाचे ऊर्ध्वमुखी, देवगणी, पिंपळवृक्ष, आराध्य असलेले शनी स्वामी असलेले आहे. या नक्षत्राची देवता बृहस्पति आहे. देवतांचे गुरु बृहस्पति यांचा जन्म पुष्य नक्षत्रावर झाल्याचे पौराणिक कथांमधून कळते.
हळवेपणा, परोपकार, निडरपणा, नेतृत्वशक्ती, दातृत्व मुख्यता हे गुण पुष्य जन्म नक्षत्र असल्यास आढळतात. प्रभास खरं मधुचक्र पुष्य या तेजपुंज तारा पासून हे बाणाकृती नक्षत्र दिसते. गुरुपुष्यामृतच्या दिवशी प्रथम गुरु अर्थात आपल्या माता-पित्यांचे तसेच गुरूंचे पूजन करावे. गुरु प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. कुलदैवत तसेच इष्ट देवतांचे स्मरण करावे. दान- धर्म अन्नदान करावे.









