मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या अटी व शर्ती मनोज जरांगे पाटील आणि आंदोलकांनी पाळल्या नाहीत. त्यामुळे मनोज जरांगेना तातडीने अटक करा, त्यासोबत त्यांना भेटलेल्या खासदार, आमदारांनाही अटक करा अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिस महासंचालकांकडे केली आहे. तसचे मुंबई पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक आझाद मैदान यांच्याकडेही त्यांनी तक्रार केली आहे.
या आंदोलनाचे स्वागत करत उध्दव ठाकरे यांनी आंदोलनाचे समर्थन केले आहे. त्यांनी भाषण करतांना जरांगेच्या आंदोलनावरुन राजकारण केल्याचे सांगत त्यांच्याही अटकेची मागणी केली आहे. मनोज जरांगे पाटील बरोबरच उध्दव ठाकरे, खासदार संजय जाधव, बजरंग आप्पा सोनवणे, यांच्यावरही कारवाईची मागणी केली आहे.
सदावर्ते म्हणाले की, सरकारवर व्हिक्टिम कार्ड खेळता येईल यासाठी हे केले जात आहे. मनोज जरांगेचा फक्त मुखवटा आहे. राजकारण हे आंदोलनाचा आत्मा आहे. उध्दव ठाकरेंची या आंदोनलास मुख संमती आहे. त्यांच्याकडून होणारे स्वागत हे त्यांची इन्ह्वाॅल्व्हमेट दाखवत आहे. उध्दव ठाकरेंमध्ये दम असेल तर त्यांनी खरं बोलाव, ते आंदोलनात आहेत ते सांगाव.
दरम्यान जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे.