रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये RPF कॉन्स्टेबलचा अंधाधुंद गोळीबार… चार जणांचा मृत्यू…

by India Darpan
जुलै 31, 2023 | 11:48 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पालघरमध्ये जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चढताना एका RPF कॉन्स्टेबलने त्याच्या वरिष्ठ ASI वर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत गोळी लागल्याने एएसआय आणि अन्य ३ प्रवाशांचा मृत्यू झाला. चेतन नावाच्या हवालदाराने गोळीबार केला. ज्याला पोलिसांनी मीरा रोड येथून अटक केली आहे. आरपीएफ जवानाने गोळीबार करण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

ही घटना सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली. रेल्वेच्या B 5 कोचमध्ये हा गोळीबार झाला. गोळीबारात गोळी लागल्याने ४ जणांचा मृत्यू झाला. गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी आरपीएफ कॉन्स्टेबल आणि त्याचा वरिष्ठ एएसआय यांच्यात काही मुद्द्यावरून बाचाबाची आणि वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर रागाच्या भरात हवालदाराने गोळीबार केला. दहिसर परिसरात पालघर ते मुंबई दरम्यान रेल्वेवर गोळीबार झाला. आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन हा मानसिक तणावाखाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईतील डीआरएम नीरज वर्मा यांनी सांगितले की, सकाळी ६ च्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की आरपीएफ जवानाने गोळीबार केला, ज्यामध्ये चार जण ठार झाले. आरोपी हवालदार एस्कॉर्ट ड्युटीवर तैनात होता. रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. मृतांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे. मृतांच्या नातेवाईकांना भरपाई जाहीर केली जाईल.

पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ म्हणाले की, ‘आज मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. एक आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन कुमारने त्याचा सहकारी एएसआय टिकाराम मीणा यांच्यावर गोळीबार केला. यादरम्यान अन्य तीन प्रवाशांनाही गोळ्या लागल्या. प्राथमिक तपासात आरोपीने आपल्या सर्व्हिसच्या शस्त्रानेच गोळीबार केल्याचे समोर आले आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.’

गोळीबारात शहीद झालेल्या RPF ASI टिकाराम मीणा यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा पश्चिम रेल्वेने एक निवेदन जारी केली आहे. पश्चिम रेल्वेने सांगितले आहे की दिवंगत ASI च्या नातेवाईकांना रेल्वे सुरक्षा कल्याण निधीतून १५ लाख रुपये, मृत्यू किंवा सेवानिवृत्ती निधीतून १५ लाख रुपये दिले जातील. याशिवाय मृतांच्या नातेवाईकांना अंतिम संस्कारासाठी २० हजार रुपये आणि विमा योजनेअंतर्गत ६५ हजार रुपये देण्यात येणार आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

येवला-कोपरगाव रोडवर ट्रकच्या धडकेत होमगार्डचा मृत्यू…

Next Post

पंतप्रधान मोदी उद्या पुणे दौऱ्यावर… असे आहेत त्यांचे संपूर्ण कार्यक्रम…

India Darpan

Next Post
Narendra Modi e1666893701426

पंतप्रधान मोदी उद्या पुणे दौऱ्यावर... असे आहेत त्यांचे संपूर्ण कार्यक्रम...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011