मुंबई – भारतीय परंपरेत जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची पद्धत आहे. जोपर्यंत गोड खात नाही तोपर्यंत जेवण पूर्ण मानले जात नाही. खाण्यानंतर काहीतरी गोड तर झालेच पाहिजे. मात्र जर तुम्ही डायट कॉन्शस असाल किंवा फिटनेसची चिंता असेल तर शुगल कॅलरीजची चिंता सतावत असते. पण चिंता करण्याची गरज नाही. कारण गुळाची पोळी खाणे हा तुमच्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे. गुळाची पोळी हेल्दी आणि टेस्टीदेखील आहे. जुन्या काळात जेवणानंतर एक छोटी गुळाची पोळी ताटात वाढली जायची. ज्या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला पारंपरिक थाळी मिळते, तिथे जेवणात गुळाची पोळीही दिली जाते. त्यामुळे गुळाच्या पोळीची रेसिपी जाणून घेण्याची उत्सुकता वाढलेली असेलच. तर चला बघुया काय आहे रेसिपी…
हे साहित्य हवे
– अर्धा कप गुळाचे पावडर किंवा किसलेला गूळ
– सव्वा कप कणीक
– १ चमचा सौफ
– एक चमचा तूप
– २ मोठे चमचे कोरडे नारळ (पर्यायी)
– आवश्यकता भासल्यास तळण्यासाठी तूप
अशी आहे रेसिपी
एका बाऊलमध्ये अर्धा कप गुळाचे पावडर आणि अर्धा कप पाणी घ्या. ते चांगल्याप्रकारे मिक्स केल्यानंतर ३० ते ४५ मिनीटांसाठी गूळ मिक्स होईपर्यंत एका बाजुला ठेवा. दुसऱ्या पॅनमध्ये १ ते सव्वा कप गव्हाची कणीक घ्या. सोबतच १ चमचा सौफ आणि १ चमचा तूप टाका. सर्वांत पहिले गुळाला मिक्स करायचे आणि एका चाळणीच्या मदतीने थेट कणकेच्या प्याल्यात मिक्स करा. ते चांगेल घोळून घ्या. हे सारे मिश्रम तयार केल्यानंतर कणीक ओली वाटत असेल तर आणखी थोडी कणीक टाका.
ही आहेत पोषण मूल्य
गुळाच्या पोळीत व्हिटामीन बी१, व्हिटामीन बी३, व्हिटामीन बी६, व्हिटामीन सी, व्हिटामीन ई, व्हिटामीन के, व्हिटामीन बी९, आयरन, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, झिंक आदी पोषण मूल्य आढळतात.