इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देतांना शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी त्यावेळी अजित पवार यांना सोबत घेतले नसते तर शिवसेनाला १२५ जागा मिळाल्या असत्या आणि आमच्याही शंभर जागा निवडून आल्या असत्या असा दावा केला आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३० जागा मिळाल्या. त्यात भाजपला १३२, शिवसेना शिंदे गटाला ५७, राष्ट्रवादी अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या. त्यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले अजित पवार यांना सोबत घेतले त्यावेळी आम्ही विरोध केला नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो होतो. मात्र तरीही त्यावेळी अजित पवार यांना सोबत घेतले गेले. त्यांना घेतले गेले नसते तर शिवसेनेलाही सव्वाशे जागा मिळाल्या असत्या. शेवटी केंद्राच्या फायद्यासाठी ते सुरु होते. त्यासाठी आम्ही भाजपला मदत केली. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे यासाठी आम्ही कुठलीही आडकाठी केली नाही. सर्व गोष्टींमध्ये तडजोड केली असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर यावर राष्ट्रवादीने तिखट प्रतिक्रिया दिली. गुलाबराव गुलाबराव रहा…जुलाबराव होऊ नका असे सांगितले.