जळगाव – शिवसेनेचे उपनेते व मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात भाजप नेते निलेश राणे यांनी आक्षेपार्ह ट्वि्ट केल्यानंतर शिवसेनेने संताप व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. शिवसेना महानगर व शिवसेना महिला आघाडीतर्फे शहर पोलीस स्थानकात निवेदन देण्यात आले असून त्यात भाजपचे पदाधिकारी आ. नितेश राणे व खा. निलेश राणे हे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे व पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी अर्वाच्य व शिवराळ भाषेचा वापर करून त्यांच्यावर टीका करतात. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे म्हटले आहे.
भाजपचे पदाधिकारी आ. नितेश राणे व खा. निलेश राणे हे सातत्याने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या बाबतीत सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी अर्वाच्य व शिवराळ भाषेचा वापर करून त्यांच्यावर टीका करत असतात. त्यामुळे सायबर क्राईम कायद्यान्वये त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येऊन त्वरित त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. तसेच त्यांचे फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हाट्सअप आधी सामाजिक माध्यमे बंद करण्यात यावी. अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई न केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे देखील निवेदनात सांगण्यात आले आहे.
सुपारी चोर गुलाब पाटीलसाठी हा योग्य कार्यक्रम आहे. इतर वेळेला कुत्र्यासारखं भुंकण्यापेक्षा या भाडखाऊ गुलाबाने कव्वाली गात राहावी, असं सगळं बघून स्वर्गीय बाळासाहेबांची आठवण जास्त येते, आता शिवसेनेची वाटचाल काँग्रेस आणि MIM पक्षाच्या दिशेने जोरदार सुरू आहे. https://t.co/iPjL0R8olD
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) November 6, 2021