मुंबई – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले गुलाब चक्रीवादळ हे ओडिशा व आंध्र प्रदेशमध्ये आल्यानंतर त्याची तीव्रता कमी झाली आहे. मात्र, या वादळामुळे महाराष्ट्राच्या हवामानावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळेच आज आणि उद्या असे दोन दिवस मेघ गर्जनेसह वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. विदर्भात आज विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर, उद्या (२८ सप्टेंबर) मध्य महाराष्ट्र, मुंबई आणि कोकणात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावऊस होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी बघा खालील व्हिडिओ
गुलाब चक्रीवादळाचा परिणाम -आज आणि उद्या महाराष्ट्रात मेघ गर्जनेसह वादळी वारे आणि मुसळधार पाऊस pic.twitter.com/MeZ3OFYiS7
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 27, 2021