मुंबई – बंगालच्या उपसागरात घोंगावत असलेल्या चक्रीवादळाचा परिणाम राज्याच्या हवामानावरही होत आहे. त्यामुळेच आज उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात काही ठिकाणी पावसाने दोरदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुलाब चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात उत्तर आंध्र प्रदेश ते दक्षिण ओडिशा किनारपट्टीकडे सरकत आहे. आज मध्यरात्री पर्यंत हे चक्रीवादळ कलिंगपट्टणम, गोपालपूर येथे धडकण्याची शक्यता आहे. परिणामी, महाराष्ट्रावरही त्याचा मोठा परिणाम होणार आहे. आगामी ३ ते ४ दिवसासाठी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. इशारा देण्यात आलेल्या भागामध्ये उत्तर महाराष्ट्र, कोकण, मुंबई, पुणे, मराठवाड्याचा काही भाग यांचा समावेश आहे. हवामान विभागाने नकाशासह दिलेली सविस्तर माहिती अशी