इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुजरातमधील आणंद जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला. येथील सोजित्रा तहसीलच्या डाळी गावाजवळ कार, ऑटो आणि दुचाकी यांच्यात भीषण टक्कर झाली, त्यात सहा जणांचा मृत्यू झाला. या मृतांपैकी तीन जण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. ऑटोमधील चार आणि दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, कार चालकाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कार, ऑटो आणि दुचाकी यांच्यात ही धडक झाली. रक्षाबंधन साजरी करून घराकडे निघालेल्या ३ महिलांचा मृतांमध्ये समावेश आहे. ही कार गुजरात काँग्रेस आमदार पूनमभाई परमार यांचे जावई केतन पढियार यांच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी केतनला आरोपी बनवून गुन्हा दाखल केला आहे. घटना सोजित्रा तालुक्यातील डाळी गावातील आहे. येथे (GJ23-CD-4404 क्रमांकाच्या ) एसयूव्ही कारने प्रथम ऑटोचालकाला धडक दिली. या घटनेत ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या 4 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर याच एसयूव्हीने दुचाकीस्वारालाही धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील अन्य 2 जणांनाही आपला जीव गमवावा लागला. सर्व मृतक रक्षाबंधन सण साजरा करून परतत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या तपासात कार चालकाचा निष्काळजीपणा समोर आला आहे.
यात कार चालक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. एसपी आनंद अभिषेक गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या कारणाचा शोध सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. घटनेनंतर समोर आलेल्या फोटोंमध्ये आरोपी ड्रायव्हरची एसयूव्ही पांढऱ्या रंगात दिसत आहे. त्याचा पुढचा भाग खराब झाला आहे. तर ऑटो आणि दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेवरून भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी काँग्रेसला घेरले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “जेथे काँग्रेस आहे, तिथे मृत्यू आणि आपत्ती आहे. गुजरात काँग्रेसच्या नातेवाईकाच्या गाडीने 6 जणांचा बळी घेतला आणि मीडिया गप्प आहे. कल्पना करा ही गाडी भाजपच्या नातेवाईकाची असती तर आत्तापर्यंत परिस्थिती वेगळी असती. एकाच कुटुंबातील तीन जण रक्षाबंधन साजरी करून घरी परतत होते.
https://twitter.com/ani_digital/status/1557943465484333057?s=20&t=BcKN2U_U1slBT29q3YaEDg
Gujrat MLA Son in Law Car Accident 6 Killed
Anand Congress MLA BJP Allegation