रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

गुजरातचे महाराष्ट्रात अतिक्रमण… अनेक गावांवर दावा.. ग्रामस्थांमुळे झाले उघड…

ऑगस्ट 5, 2023 | 6:46 pm
in राष्ट्रीय
0
Fd9DF37aMAAQoAS

पालघर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याराज्यांमधील सीमावाद आपल्याला नवीन नाही. कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाने तर मागील वर्षी अक्षरश: वातावरण तापविले होते. त्यात आता गुजरात-महाराष्ट्र सीमावादाची भर पडली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरील काही गावांनी गुजरातद्वारे झालेल्या अतिक्रमणाचा मुद्दा पुढे केला आहे. यामुळे नवीन संघर्षाला सुरुवात झाली आहे.

गुजरातमधील उंबरगाव येथील सोलसुंबा या ग्रामपंचायतीने महाराष्ट्रातील वेवजी ग्रामपंचायतीमध्ये जवळपास दीड किलोमीटर अतिक्रमण केल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील गावांवर, भूभागावर गुजरात दावा सांगत असल्याचा मुद्दा डहाणूचे माकपाचे आमदार विनोद निकोले यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केला होता. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा तातडीने कामाला लागली होती. दरम्यान, तपासणी केल्यानंतर वेवजी गावात गुजरातच्या ग्रामपंचायतीने काम केले असल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्राच्या ऐवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्ट्रीट लाईट बसण्याची परवानगी गुजरातमधील सोलसुंबा ग्रामपंचायतीने मागितली होती. परवानगी मिळाल्यानंतर गुजरातच्या ग्रामपंचायतीने याठिकाणी काम सुरू केले. मात्र, विधानसभेत आमदार विनोद निकोले यांना हा मुद्दा उपस्थित सोलसुंबा गावाला देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात आल्याचे ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तसेच शासनाला या भागातील सीमांकन करण्यासाठी पत्र देण्यात आलं असून पुढील गोष्टींचा पाठपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिली आहे. गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमा भागातील अनेक व्यवहार दोन्ही राज्यांच्या सीमेवरील गावांवर चालतात.

दीड किमीपर्यंत लावले पथदिवे
गुजरातच्या सोलसुंबा ग्रामपंचायतीने बेकायदा पथदिवे लावून घुसखोरी केल्याच्या प्रकारावरून महाराष्ट्रातील वेवजी ग्रामस्थांनी विरोध सुरू केल्यामुळे हा सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमा भागातील अनेक व्यवहार दोन्ही राज्यांच्या सीमेवरील गावांवर चालतात. उंबरगाव येथील सोलसुंभा ग्रामपंचायतीने महाराष्ट्रातील वेवजी ग्रामपंचायत हद्दीत दीड किलोमीटर आत घुसखोरी केल्याने सीमावाद अद्याप चिघळत आहे. दोन राज्यांतील सीमा सुस्पष्ट व्हावी, त्यामध्ये सुसूत्रता यावी, दोन राज्यांच्या सीमेवर नागरिकांना विनातक्रार प्रवास करता यावा, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, आदानप्रदान टिकवण्यासाठी दोन्ही राज्यांच्या सीमेवरील ग्रामपंचायती आणि प्रशासनाने एकत्र येऊन हा रेंगाळलेला प्रश्न तात्काळ मार्गी लावणे गरजेचे झाले आहे.

कोरोना काळातही बसला फटका
गुजरात राज्याची हद्द सुरु अशा आशयाचा बोर्ड असलेल्या जागेपासून अवघ्या पाचशे मीटर आधीपासून हे स्ट्रीट लाईट बसवण्यात आले होते. त्यामुळे कोरोना काळामध्ये राज्याच्या सीमा बंद असताना देखील याचा मोठा फटका येथील स्थानिकांना बसल्याचं सांगण्यात येत आहे. तर सध्या या भागाचे सीमांकन निश्चित नसल्याने हा वाद आणखी चिघळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Gujrat Maharashtra Border Villages Encroachment
Palghar District Street Light Facilities Dispute solsumba Gram Panchyat

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुणेकरांनो सावधान… सीएनजीचे पंप या तारखेपासून राहणार बंद!

Next Post

अमित शाह उद्या पुण्यात… असा आहे दौरा… याचे करणार उदघाटन

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
amit shah

अमित शाह उद्या पुण्यात... असा आहे दौरा... याचे करणार उदघाटन

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011