इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. या दोन्ही निवडणुका भारतीय जनता पक्षाने अतिशय प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मंत्री, अन्य राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या सभा आणि रॅलींचा धडाका लावला होता. त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्राही याच निवडणुकीदरम्यान सुरू होती. त्याचबरोबर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुजरात व हिमाचलमध्ये सभांचा धडाका लावला होता. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा करिष्मा चालणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. प्रत्यक्षात भाजपने दणदणीत विजय मिळविला आहे. सलग सातव्यांदा गुजरातमध्ये कमळ फुलले आहे. काँग्रेस आणि आपचा करिष्मा चाललेला नाही. तर, हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने सत्ता गमावली आहे. तिथे काँग्रेसने बहुमत मिळविले आहे.
गुजरात विधानसभा निवडणूक २०२३
एकूण जागा – १८२
बहुमतासाठी आवश्यक – ९२
भारतीय जनता पक्ष – २ (आघाडीवर) १५४ (विजय) एकूण १५६ (+५७)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – ०० (आघाडीवर) १७ (विजय) एकूण १७ (-६०)
आम आदमी पार्टी – ०० (आघाडीवर) ०५ (विजय) एकूण ०५ (+५)
अपक्ष – ०० (आघाडीवर) ०४ (विजय) एकूण ०४ (-२)
गुजरात विधानसभा निवडणूक २०१७
एकूण जागा – १८२
बहुमतासाठी आवश्यक – ९२
भारतीय जनता पक्ष – ९९
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – ७७
आम आदमी पार्टी – ००
अपक्ष – ०६
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक २०२३
एकूण जागा – ६८
बहुमतासाठी आवश्यक – ३५
भारतीय जनता पक्ष – ०० (आघाडीवर) २५ (विजय) एकूण २५ (-१८)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – ०० (आघाडीवर) ४० (विजय) एकूण ४० (+१९)
आम आदमी पार्टी – ००
अपक्ष – ०० (आघाडीवर) ०३ (विजयी) एकूण ०३
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक २०१७
एकूण जागा – ६८
बहुमतासाठी आवश्यक – ३५
भारतीय जनता पक्ष – ४४
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – २१
आम आदमी पार्टी – ००
अपक्ष – ०३
Gujrat Himachal Pradesh Assembly Election Results Update