इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनुस्मृतीतील संदर्भाचा उल्लेख करत सतरा वर्षीय मुलीलाही बाळ होत असल्याची टिप्पणी हायकोर्टाने केली आहे. हायकोर्टाच्या टिप्पणीने नवीन वादाला जन्म घातला आहे.
गुजरातधील एका १७ वर्षीय मुलीच्या बलात्कारप्रकरणाशी संबंधित खटल्याच्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने मनुस्मृतीमधील संदर्भांचा उल्लेख केला आहे. गुजरातमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. यानंतर पीडिता गरोदर राहिली होती. ती आता सात महिन्यांची गरोदर आहे. तिच्या गर्भपाताला संमती मिळावी म्हणून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.
या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाचे न्यायमूर्ती समीर जे. दवे यांनी तोंडी मत मांडले आहे. जुन्या काळात १४-१५ व्या वर्षी मुलीचे लग्न होणे आणि वयाच्या १७ व्या वर्षी तिला मूल होऊन ती एका मुलाची आई होणे ही अगदी सामान्य बाब होती. मनुस्मृती वाचा… तुम्हाला कळेल, अशी महत्त्वाची टिप्पणी गुजरात हायकोर्टाने केली आहे. या टिप्पणीनंतर चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ जून रोजी होणार आहे.
जबाबदारी कोण घेणार?
पीडित मुलीच्या वकिलांनी या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर व्हावी, अशी मागणी केली आहे. १८ ऑगस्टला या मुलीला प्रसूतीची तारीख डॉक्टरांनी दिली आहे. मात्र, गर्भपातासाठी मुलीच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यावर पीडिता आणि तिच्या पोटात वाढणारे बाळ या दोघांची प्रकृती व्यवस्थित असेल, तर गर्भपाताची संमती दिली जाणार नाही, असे हायकोर्टाने म्हटले आहे. जस्टिस समीर दवे जर गर्भपाताच्या प्रक्रियेदरम्यान, मूल जिवंत जन्माला आले, तर त्याची काळजी कोण घेणार? जर एखाद्या मुलाचा जिवंत जन्म झाला असेल तर तिला मारण्याची न्यायालय परवानगी देऊ शकते का? असा सवालही न्यायाधीशांनी उपस्थित केला.
Gujrat High Court on Minor Girl Birth