इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मोदी आडनाव वापरून टिप्पणी केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यानंतर त्यांना संसदेचे सदस्यत्व गमवावे लागले आहे. ही शिक्षा गुजरात उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.
गुजरातमधील सूरत न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला राहुल यांनी हायकोर्टात आव्हान दिले होते. मात्र, हायकोर्टाने त्यांची शिक्षा कायम ठेवत त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती हेमंत प्रचाक यांनी राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती करणारी याचिका फेटाळून लावली आहे.
राहुल यांच्याविरुद्ध किमान १० फौजदारी खटले प्रलंबित आहेत. या प्रकरणानंतरही त्याच्यावर आणखी काही गुन्हे दाखल आहेत. अशीच एक केस वीर सावरकरांच्या नातवाने दाखल केली आहे. शिक्षेने कोणावरही अन्याय होणार नाही, असेही न्यायमूर्ती म्हणाले. शिक्षा न्याय्य आणि योग्य आहे. यापूर्वी दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. त्यामुळे अर्ज बाद करण्यात आला आहे, असे न्यायालयानेे स्पष्ट केले.
मोदी हे आडनाव वापरून केलेल्या टिप्पणीबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली, त्यानंतर त्यांचे संसदेचे सदस्यत्वही गेले आहे.