रविवार, सप्टेंबर 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

गुजरातमध्ये बनावट आयपीएल रॅकेटचा पर्दाफाश; आरोपींनी कबूल केल्या या धक्कादायब बाबी

by Gautam Sancheti
जुलै 21, 2022 | 5:24 am
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – क्रिकेट भारतीय नागरिकांचा अत्यंत आवडता खेळ आहे, खूप वर्षापूर्वी सामन्यांची मालिका रंगत असे, त्यानंतर एक दिवस हे सामने सुरू झाले, कालांतराने ट्वेंटी-ट्वेंटी मॅच सुरू झाल्या, आता आयपीएलचा जमाना आहे, आयपीएलचा फिव्हर तरुणांमध्ये विशेषत्वाने जाणवतो.

इंडियन प्रीमियर लीग हे संपूर्ण जगातील सर्वांत मोठे लीग समजले जाते. या लीगमध्ये अनेक परदेशातील खेळाडूंचा सहभाग असतो. मात्र, हे सर्व अधिकृत मार्गाने सुरू असते. परंतु गुजरात मध्ये झालेल्या या IPLमध्ये क्रिकेटरपासून अंपायरपर्यंत सगळेच बोगस असल्याचे उघडकीस आले आहे.

गुजरातच्या वडनगरमधील एका गावात अनेक दिवसांपासून आयपीएलचे बनावट क्रिकेट लीग चालवले जात होते या फेक IPLचा लाईव्ह थरार दाखवला जात होता. HD कॅमेऱ्याने या मॅचचे रेकॉर्डिंग करुन यु ट्यूबवर LIVE प्रेक्षेपणही केले जात होते. गुजरात पोलिसांनी बनावट आयपीएल रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या चौघांविरुद्ध फसवणूक, सट्टेबाजी व इतर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणातील एका आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. हा फरार आरोपी रशियात राहत असून तेथूनच तो सट्टेबाजीचे संपूर्ण रॅकेट हँडल करत असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

विशेष म्हणजे १५ दिवसांहून अधिक काळ आयपीएल सुरू असल्याचे भासवत यूट्यूब चॅनलवर बनावट क्रिकेट सामने थेट प्रक्षेपित केले जात होते. गावातील शेतमजूर आणि बेरोजगार तरुणांना तयार करून चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सचे टी-शर्ट घालायला दिले. त्याचप्रमाणे वॉकी-टॉकी आणि पाच एचडी कॅमेरेही वापरले. यासोबतच मॅच ऑथेंटिक होण्यासाठी ‘अॅम्बियन्स साऊंड’ देखील जोडण्यात आला होता. हर्षा भोगलेची नक्कल करण्यासाठी मेरठमधील एका समालोचकाला पण आणले होता. या मॅचेसची टेलिग्राम चॅनेलवर थेट सट्टेबाजी सुरू होती.

इतकेच नव्हे तर गुजरातमध्ये सुरू असलेल्या या बनावट आयपीएलचे कनेक्शन थेट रशियाशी आहे. रशियातील ट्व्हर, वोरोनेज आणि मॉस्को या तीन शहरांतील लोकांना या फेक IPLच्या जाळ्यात अडकवण्यात आले होते. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त केले असून आतापर्यंत घटनास्थळावरून 3 लाख रुपयांसह 4 जणांना अटक करण्यात आली आहे.

या बनावट खेळासाठी वडनगरच्या मॉलीपूर गावात काही नागरिकांनी खास या फेक IPL साठी एक शेत विकत घेतले होते. या शेताला त्यांनी क्रिकेटचे मैदान बनवले. येथे फ्लड लाइट्स लावण्यात आले आणि ग्राऊंडही तयार करण्यात आले. मल्टी कॅम सेटअप, कॉमेंट्री बॉक्ससह सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली होती.

त्यामुळे ते संपूर्ण आयपीएलसारखे दिसेल, असे त्यांना वाटत होते, इतकेच नाही तर हा सामना मोबाईल अॅपवरही लाईव्ह दाखवण्यात आला होता. गावातील काही तरुण मंडळींना मॅच खेळण्याच्या कामावर ठेवले होते, त्यांना प्रत्येक सामन्यासाठी 400 रुपये दिले जायचे. स्थानिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रशियात बसलेला व्यक्ती सर्व व्यवस्था करत असे आणि त्याच्या सांगण्यावरून हा सर्व खेळ रचण्यात आला होता.

Gujrat Fake IPL Match Racket Burst by Police Crime

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अभिनेता शरद पोंक्षे यांची कन्या होणार वैमानिक; शेअर केला हा फोटो

Next Post

सततच्या पावसामुळे नाक गळतंय? खोकलाही झालाय? घरच्या घरी करा हे उपाय

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता, जाणून घ्या, रविवार, २१ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 20, 2025
cricket
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये नोव्हेंबर मध्ये दोन रणजी सामन्यांचा थरार….हे सामनेही होणार

सप्टेंबर 20, 2025
crime1
क्राईम डायरी

अनैतिक संबधाच्या संशयातून परप्रांतीय तरुणाचे अपहरण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

सप्टेंबर 20, 2025
rajanatsing
राष्ट्रीय

संरक्षण मंत्री या तारखे दरम्यान मोरोक्कोला देणार भेट…दोन दिवसाचा दौरा

सप्टेंबर 20, 2025
rape
क्राईम डायरी

चार महिन्यापासून महिलेच्या मोबाईलवर अश्लिल फोटो, व्हिडीओ व संदेश पाठवले…गुन्हा दाखल

सप्टेंबर 20, 2025
fir111
क्राईम डायरी

नाशिकमध्ये दिग्दर्शक असलेल्या तरुणाची साडेपाच लाख रूपयांची अशी केली फसवणूक

सप्टेंबर 20, 2025
Screenshot 20250920 151721 WhatsApp 1
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वरमध्ये गावगुंडाकडून पत्रकारांना बेदम मारहाण…काठी व दगडाचा वापर

सप्टेंबर 20, 2025
cbi
संमिश्र वार्ता

CBI ने या स्पर्धा परिक्षा घोटाळ्यातील भरती प्रकरणी पाच आरोपींना केली अटक…IAS सह उच्च अधिकारी जाळ्यात

सप्टेंबर 20, 2025
Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

सततच्या पावसामुळे नाक गळतंय? खोकलाही झालाय? घरच्या घरी करा हे उपाय

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011