इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क – गुजरात विधानसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. च्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडले आहे. मतदानाचा आणखी एक टप्पा बाकी आहे. येत्या ८ डिसेंबरला मतमोजणी आहे. गुजरातमध्ये गेल्या २७ वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. भाजपला काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून आव्हान दिले जात आहे. सध्याच्या निवडणूक प्रचारात शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्याचे कारणही तसे आहे.
पहिल्या टप्प्यात ३९ पक्षांचे ७८८ उमेदवार रिंगणात आहेत. तर एकूण १८२ जागा आहेत. गुजरात लगत असलेल्या सीमा भागात महाराष्ट्रातून भाजपचे काही नेते आणि कार्यकर्ते मंडळी प्रचारासाठी जात आहेत. विशेष म्हणजे नाशिक शहरातून देखील काही पदाधिकारी प्रचारासाठी रवाना झाले आहेत. परंतु सध्या गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान एका वेगळ्याच गोष्टीची चर्चा सुरू आहे ती म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका जुन्या व्हिडिओतील संभाषणाची होय.
आता भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रविंद्र जाडेजाची पत्नी रीवाबा जाडेजाला उमेदवारी घोषित झाली असून विरोधात काँग्रेस कडून नणंदबाई उभ्या आहेत, यावेळी रविंद्र जाडेजाने मोदींची भेट घेतली होती. आता रवींद्र जडेजा यांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांचा व्हीडीओ शेअर करून एक प्रकारे रीवाबाला निवडून देण्याचे आवाहनच केल्याचे सांगितले जात आहे.
निवडणुकाचा दुसरा टप्पा आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. प्रमुख पक्षांकडून प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. यंदा अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने गुजरात निवडणुकीवर लक्ष केंद्रीय केल्याने या निवडणुकीमध्ये चूरस निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. भाजपा आणि काँग्रेस हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. मात्र यावेळी आम आदमी पार्टी आणि ओवैसीमुळे निवडणुकांचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे. मात्र राजकीय निरीक्षकांच्या मते गुजरातमध्ये मुख्य लढाई भाजपा आणि काँग्रेसमध्ये होईल, असे म्हटले जाते.
रीवाबा जडेजा या सन २०१९ पासून भाजपचे काम करत आहेत. जामनगरच्या विकासासाठी त्यांच्याकडे अनेक प्लॅन्स आहेत, असाही त्यांनी दावा केला असून रीवाबा यांच्यासमोर त्यांची नणंदबाई नैना जाडेजाचे आव्हान आहे, नैना या काँग्रेसच्या महामंत्री आणि जामनगरच्या स्टार प्रचारक आहेत. आता येथे नैना यांच्या वहिनी म्हणजेच रीवाबा जाडेजा भाजपच्या उमेदवार आहेत. तिथेच नैना जाडेजा काँग्रेस उमेदवारासाठी दिवसरात्र प्रचार करत आहेत. जामनगरच्या जागेवरुन नणंद-भावजयीचा संघर्ष सुरु झाला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आज पहिल्या टप्प्यात मतदान सुरू झाला असून या मतदानाच्या काही तासापूर्वीच प्रसिद्ध क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याने शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल केला आहे. तसेच पोस्टवर नरेंद्र मोदी नसतील तर गुजरातही हातचे जाईल, अशी कमेंट केली आहे. अभी भी समय है, समझ जाओ गुजरातियों, असे कमेंट करत जडेजाने बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
विशेष म्हणजे आज मतदान असल्याने हा व्हिडीओ सर्वाधिक व्हायरल होत आहे. अवघ्या १९ सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. तीन तासांपूर्वी पोस्ट केलेल्या व्हिडीओला लाखो व्ह्यूज आहेत. आणि हजारो लाईक्स मिळाले आहेत. तसेच नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या असून मोठ्या प्रमाणावर हे ट्विट शेअर केले आहे. विशेष म्हणजे सुरत, बडोदा, अहमदाबाद आदी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी भाषिक नागरिक राहत असल्याने स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या या व्हिडिओची प्रचंड चर्चा होत आहे.
https://twitter.com/imjadeja/status/1597949685779480576?s=20&t=Vm4_1gZa4FdAbGPRnk0yDw
Gujrat Election Balasaheb Thackeray Video Viral Politics