नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील सर्व व्यापारी, वजने व मापे उपयोगकर्ते, विक्रेते यांनी अधिकृत परवानाधारक उत्पादक व विक्रेते यांच्याकडूनच वजन काटे खरेदी करावेत, असे आवाहन उपनियंत्रक, वैध मापनशास्त्र नाशिक, जिल्हा क्रमांक १, अ.शि. गिरनारे आणि उपनियंत्रक, वैध मापनशास्त्र नाशिक (ग्रामीण), जिल्हा क्रमांक २, प्र. र. परदेशी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
सध्या बाजारामध्ये शेजारील राज्यातून विशेषत: गुजरात व चीन देशातून आयात होणाऱ्या अप्रमाणित वजन काट्यांचे सुटे भाग व वजन काटे अनधिकृत खरेदी-विक्री होतांना आढळून येत आहे. हे वैधनमापन शास्त्र अधिनियिम २००९ नुसार अवैध व नियमबाह्य आहे. अधिकृत परवानाधारक उत्पादक व विक्रेते यांच्याकडून वजन काटे खरेदी करतांना खरेदी पावती व वैधमापन विभागाचे पडताळणी प्रमाणपत्र असल्याची व्यापारी व ग्राहक यांनी खात्री करावी.
सर्व व्यापारी, वजन व मापे उपयोगकर्ते, विक्रेते यांनी वैधमापन अधिनियम २००९ व त्या अंतर्गत बनविलेले नियम यांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत उपनियंत्रक, वैध मापनशास्त्र गिरनारे आणि परदेशी यांनी कळविले आहे.
Gujrat China Fake Weighing Machine Weight and Measurement