इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आज देशभरात हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. या विशेष प्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातमधील बोटाड जिल्ह्यातील सालंगपूर मंदिरात भगवान हनुमानाच्या 54 फूट उंच मूर्तीचे अनावरण केले. याशिवाय अमित शहा यांनी सालंगपूर हनुमान मंदिरात श्री कष्टभंजनदेव भोजनालयाचे उद्घाटन केले. हे भोजनालय सात एकरात बांधले आहे.
अहमदाबादपासून 150 किमी अंतरावर असलेल्या सालंगपूर हनुमान मंदिर परिसरात ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. असे मानले जाते की या मंदिराच्या दर्शनाने लोकांना शनिदेवाच्या प्रकोपापासून मुक्ती मिळते. मिळालेल्या माहितीनुसार, पंचधातूपासून बनवलेली 30 हजार किलो वजनाची ही मूर्ती सात किमी अंतरावरून पाहायला मिळते. याशिवाय या मूर्तीची किंमत सहा कोटी रुपये आहे. कष्टभंजन हनुमान मंदिराची स्थापना विक्रम संवत 1905 मध्ये झाली. ते सद्गुरू गोपालानंद स्वामींनी बांधले होते. गुजरातमधील बोटाड जिल्ह्यातील सालंगपूर येथे बनवलेल्या काष्ठभंजन हनुमानाला हनुमानदादा या नावाने संबोधले जाते.
Jai Bajarangabali!
Best wishes to all on Shri Hanuman Jayanti!
Shri Hanumanji is the symbol of bravery and faith!
On the occasion of Shri Hanuman Jayanti, Home Minister @AmitShah ji unveiled a 54 feet statue of Shri Hanuman ji at Salangpur Dham, Gujarat.pic.twitter.com/biYCzwT0iC
— venkatesh kanike ?? (Modi Ka Parivar) (@venkateshkanike) April 6, 2023
येथे आल्याने शनिदेवाच्या प्रकोपापासून मुक्ती मिळते, अशी श्रद्धा आहे. असे म्हणतात की एक काळ असा होता की जेव्हा लोक शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करत होते, तेव्हा भक्त हनुमानजीची पूजा करत होते. त्यानंतर हनुमानजींनी लोकांना शनिदेवाच्या प्रकोपातून मुक्त केले.
असे मानले जाते की शनिदेवाचा लोकांवर कोप झाल्याने हनुमानजींना राग आला, त्यानंतर ते शनिदेवाशी युद्ध करायला निघाले, पण जेव्हा शनिदेवांना हे कळले तेव्हा त्यांनी उपायाचा विचार करायला सुरुवात केली. बजरंगबलीपासून वाचण्यासाठी शनिदेवाने स्त्रीचे रूप धारण केले कारण त्यांना माहित होते की हनुमानजी ब्रह्मचारी आहेत, त्यामुळे ते कधीही स्त्रीवर हात उचलणार नाहीत. पण हनुमानजींनी शनिदेवाला ओळखले. त्यानंतर शनिदेव हनुमानजींच्या पाया पडून माफी मागू लागले, तेव्हा बजरंगबलीने त्यांना आपल्या पायाखाली ठेवले. तेव्हापासून कष्टभंजन हनुमान मंदिरात शनिदेव बजरंगबलीच्या पायाखाली स्त्री रूपात विराजमान आहेत आणि या रूपात त्यांची पूजा केली जाते.
સાળંગપુર ધામ (ગુજરાત) ખાતે શ્રી હનુમાન જન્મોત્સવ પ્રસંગે શ્રી કષ્ટભંજન દેવ મંદિર દ્વારા બજરંગબલીજીની 54 ફૂટની પ્રતિમાના અનાવરણ તેમજ શ્રી કષ્ટભંજન દેવ ભોજનાલયના ઉદ્ધાટન કાર્યક્રમથી લાઈવ… https://t.co/Q5C9G4QIDK
— Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) April 6, 2023
Gujrat Amit Shah Hanuman Temple