अहमदाबाद ( इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क ) – गेल्या काही दिवसांमध्ये धार्मिक वातावरणात विनाकारण तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. विशेषत धार्मिक मिरवणूकी प्रसंगी काही विघातक शक्ती कारवाया करून समाजात भीतीचे वातावरण निर्माण करतात. इतकेच नव्हे तर कायदा आणि सुव्यवस्था देखील भंग करण्याचा प्रयत्न होत असतो असाच प्रकार नुकताच गुजरातमध्ये घडला आहे.
रामनवमीच्या दिवशी गुजरातमधील आनंद जिल्ह्यातील खंभात परिसरात उपद्रव निर्माण करणाऱ्या नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी गुजरातबाहेरून आणले होते आणि पकडल्यास त्यांना पैसे आणि कायदेशीर मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. दरम्यान, आनंद जिल्ह्याचे एसपी अजित राजियन यांनी एक निवेदन जारी केले आहे की, बदमाशांचा उद्देश नागरिकांमध्ये भीती निर्माण करणे हा होता जेणेकरून त्यांनी भविष्यात असा कोणताही धार्मिक कार्यक्रम आयोजित करू नये. हे गुंड पैशासाठी काही परदेशी वंशाच्या लोकांच्या संपर्कात होते.
तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी रामनवमीच्या मिरवणुकीवर स्मशानाच्या आतून दगडफेक करण्याची योजना आखली होती, जेणेकरून त्यांना दगडांची कमतरता भासू नये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांना रामनवमीच्या मिरवणुकीची परवानगी मिळाल्याचे समजताच त्यांनी अवघ्या तीन दिवसांत ही घटना घडवून आणण्याची योजना आखली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्लीपर सेल मॉड्यूलच्या आधारे ही घटना घडवून आणण्याची योजना होती. मौलवी रजक पटेल हा या घटनेमागील सूत्रधार असल्याचे सांगितले जात असून तो सध्या फरार आहे. मौलवी रजक हा या घटनेसाठी परराज्यातील काही नागरिकांशी आणि पैशांसाठी काही परदेशी लोकांच्या संपर्कात होता.
विशेष म्हणजे निधी उभारण्याचे काम मतीन नावाच्या व्यक्तीला देण्यात आले होते. एटीएस गुजरातच्या चौकशीत जमशेद पठाण नावाच्या व्यक्तीने या घटनेचा सूत्रधार मौलवी रजक पटेल असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे रामनवमीच्या दिवशी गुजरातच्या हिम्मतनगर आणि आनंद जिल्ह्यात जातीय संघर्ष झाला, ज्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.