सोसायटी अपार्टमेंटमधील पार्किंगवरुन भांडण होताय?
आधी हे वाचा
– विजय सागर, पुणे
लाखो रुपये देऊन पार्किंग खरेदी केले तरीही ते पार्किंग सोसायटी काढून घेऊन इतर सभासदांना देऊ शकते.
ग्राहकाला पार्किंग करारनामा करून विकणे, पत्र देऊन किंवा करारनामा करताना allot करणे ही बिल्डरची कृती बेकायदेशीर आहे. त्याबाबत सुप्रीम कोर्टाने महत्त्व पूर्ण निकाल दिलेला आहे.(CIVIL APPEAL NO. 2544 OF 2010).
महाराष्ट्र फ्लॅट ओनरशिप ॲक्ट १९६३ मध्ये त्याबाबत स्पष्ट पणे तरतूद आहे की पार्किग, ओपन स्पेस, टेरेस इत्यादी कॉमन एरिया मध्ये येते आणि त्याची मालकी ही सोसायटीची असते.
पार्किंग कुणाला द्यायचे हे सोसायटी ठरवू शकते बिल्डर नाही.
एखाद्या व्यक्तीने बिल्डरला लाखो रुपये दिले असतील, करारनाम्यात तसा उल्लेख असेल, बिल्डर ने allotment letter दिले असेल तरीही सोसायटी सदर पार्किंग परत घेऊन ते इतर सभासदाला देऊ शकते असा महत्त्व पूर्ण निकाल ठाणे येथील अतिरिक्त ग्राहक आयोगाने नुकताच दिला आहे.
तेव्हा नवीन ग्राहक जे फ्लॅट खरेदी करतात त्यांनी पार्किंग अजिबात विकत घेऊ नये.
आपण लाखो रुपये पार्किंग साठी दिले तरीही सोसायटी आपले पार्किंग काढून इतर व्यक्ती ला देऊ शकते. जिथे पार्किंग साठी जागा कमी आहे तिथे सोसायटी रोटेशन पद्धतीने पार्किंग सभासदांना देऊ शकते.
ज्या सभासदांनी, फ्लॅट ग्राहकांनी या आधी बिल्डरला लाखो रुपये देऊन पार्किंग विकत घेतले आहे त्यांनी बिल्डर ला नोटीस देऊन सदर आपले पैसे व्याजासहित परत मागून घ्यावेत. आपण नोटीस देऊन ही बिल्डर पैसे परत करत नसतील तर त्यांचे विरुद्ध केस दाखल करू शकता.
तसेच आपण फसवले गेलो आहोत हे लक्षात घेऊन आपण त्या बिल्डर वर फसवणुकीचा गुन्हा इंडियन पिनल कोड नुसार दाखल करावा. मोफा कायद्या नुसार पण आपण सदर बिल्डर वर गुन्हा दाखल करू शकता.
पोलीस गुन्हा दाखल करण्यास नकार देत असतील तर आपण सदर पोलीस स्टेशन मधील ठाणे अम्मलदार यांचे विरुद्ध आय पी सी कलम १६६ नुसार तक्रार सहायक पोलीस आयुक्त यांचे कडे किंवा कमिशनर ऑफ पोलीस यांचे कडे करू शकता. शिवाय आपण ऑनलाइन FIR दाखल करू शकता. सरते शेवटी आपण न्यायालयात जाऊन सदर गुन्हा नोंदवणे साठी पोलिसांना आदेश घेऊ शकता. यासाठी कोणत्याही वकिलाची गरज लागत नाही.
याबाबत आपणास मोफत मार्गदर्शन हवे असल्यास आपण अखिल भारतीय ग्राहक पंचायत शी संपर्क करू शकता.
विजय सागर (मो. 9422502315)
संघटक पुणे महानगर आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, अखिल भारतीय ग्राहक पंचायत,
६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
मोफत मार्गदर्शन:
सोम, बुध, शुक्र सायंकाळी 6 से 7.30
www.abgpindia.com
अधिक माहितीसाठी संपर्क
श्री विलास लेले
9823132172
सौ अंजली देशमुख
9823135803
श्रीमती विजया वाघ
9075132920
श्री रवींद्र वाटवे
9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित
9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर
7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी
7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी
9890652675
श्रीमती किशोरी रावळ, हडपसर 83909 02773