नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक महानगरपालिका नाशिक व नववर्ष स्वागत समिती नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने गुढीपाडव्याच्या निमित्त वेगवेगळे कार्यक्रम होत असतात नाशिक शहराचा विस्तार होत असून शहर वाढत आहे त्या अनुषंगाने यावर्षी नवीन नाशिक मध्ये संभाजी स्टेडियम येथे नाशिक जिल्ह्यातील ३० ढोल पथक १५०० ढोल वादक एकत्रित महावादन दि. २८ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता होणार आहे. यात प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने असणार आहे. तरी सर्व नाशिककरांना नाशिक महानगरपालिका व नववर्ष स्वागत यात्रा समिती यांचे वातीने सर्व नवीन नाशिक मधील नागरिकानां या सोहळ्यात सहभागी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या ३०० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्या महारांगोळी व महावादन त्यांना समर्पित आहे. शिवकालीन शास्त्रविद्या प्रात्यक्षिक “वारसा” या कार्यक्रमातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. अंतर्नाद हा कार्यक्रम पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसैन यांना आदरांजली आहे
त्या अनुषंगाने गुरुवार २७ मार्च २०२५ रोजी पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसैन यांना समर्पित “अंतर्नाद” (१५०० हुन अधिक विद्यार्थ्यां चे हिदुस्थानी शास्त्रीय गायन, नृत्य, वादन कलेचे सादरीकरण, सायंकाळी ६.३० वाजता),शुक्रवार २८ मार्च २०२५ रोजी “महारांगोळी” पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांना समर्पित (२०००० स्क़्वे.फ फुट रांगोळी, सकाळी ७ वाजेपासून),शनीवार २९ मार्च २०२५ रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्मरण दिनानिमित्त शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आणि शस्त्र कलांचे सादरीकरण प्रात्यक्षिक (सायंकाळी ६.३० वा.),रवीवार ३० मार्च २०२५ रोजी शहरातल्या वि वि ध भागातून सकाळी ७ वाजता शोभा यात्रा होणार असून, पाडवा पटांगण (जुने भाजी पटांगण), गोदाघाट, पंचवटी , नाशिक या ठिकाणी हे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
या वर्षी शुक्रवार २८ मार्च २०२५ रोजी महावादन (१५०० ढोलांचेसमूह वादन, सायंकाळी ६.३० वाजता), छत्रपती संभाजी क्रीडासंकुल अश्विन नगर येथे होणार आहे.
हा सोहळा अधिक उत्साहाने साजरा करण्यासाठी नाशिककरांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नाशिक महानगरपालिके व नवीन नाशिक नववर्ष स्वागत समितीच्या वतीने करण्यात आले आहे.