नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, अर्थातच गुढीपाडवा, भारतीय संस्कृतीत ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा दिवस ‘महापर्व’ म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण ‘गुढीपाडवा’ म्हणून साजरा करतो. या दिवशी घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. ही गुढी स्नेहाचे, मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतिक मानली जाते. ती विजयाचा संदेशही देत असते.
म्हणूनच गुढीपाडवा व हिंदू नववर्षाचे स्वागत पारंपरिक पद्धतीनेच करण्यासाठी दरवर्षी या नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात येते.
राष्ट्रीय विकास मंडळ संचलित, नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक यांच्या तर्फे या हिंदू नववर्षाचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात आणि शोभा यात्रांच्या जल्लोषात साजरा करण्याची हि आपली परंपरा आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी ‘पाडवा पटांगणावर’ गुढीपाडव्याच्या एक आठवडा आधीपासून संस्कृती जपणारे विविध सामुहिक कार्यक्रम घेण्यात येतात. कार्यक्रमाचे उददेश हे आपल्या भारतीय संस्कृतीचे संवर्धन, जतन आणि दर्शन हा असतो. कार्यक्रमाचे विषय हे नेहमीच राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, शिक्षण सेवा, महिला सबलीकरण, गोसेवा, सामाजिक एकता जनजाती पुनरुत्थान इत्यादी राहिलेले आहेत. यंदाच्या वर्षी “पर्यावरण रक्षण” हा विषय घेऊन राष्ट्रीय विकास मंडळ संचलित, नववर्ष स्वागत यात्रा समिती व नाशिक महानगर पालिका सज्ज आहे.
हा सण अधिक चांगल्या पद्धतीने आणि उत्साहाने साजरा करण्यासाठी नाशिककरांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक चे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, उपाध्यक्ष राजेश दरगोडे, सचिव योगेश गर्गे व संघटक जयंत गायधनी यांनी केले आहे.
स्वागत यात्रा : गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी मेनरोड, रविवार कारंजा, रविवार पेठ, महात्मा गांधी रोड या परिसरातून तसेच काळाराम मंदिर परिसरातून ते पंचवटीतील प्रमुख रस्त्यांवरून पारंपारिक वेशभूषेत शोभायात्रा काढली जाते. यात लेझीम पथक, चित्ररथ, ढोल पथक, मल्लखांब, महिला बाईक सफारी, मंगळागौरीचे खेळ व मर्दानी खेळ चे पथक असते.
पंचवटी स्वागत यात्रा क्रमांक १
काळाराम मंदिरापासून सुरुवात ठीक सकाळी ७ वाजता
मार्ग
काळाराम मंदिर – नाग चौक -चार हत्ती पूल- गुरुद्वारा रोड गजानन चौक – पाथरवट लेन- शिवाजी चौक – पंचवटी कारंजा- मालेगाव स्टॅन्ड – रामकुंड – पाडवा पटांगण
पंचवटी स्वागत यात्रा क्रमांक २
यात्रा सुरुवात सकाळी ७ वाजता
मार्ग
कौशल्या नगर रामवाडी – तळेनगर -क्रांतीनगर -मधुबन कॉलनी – राजपाल कॉलनी – मखमलाबाद नाका – मालेगाव स्टॅन्ड – रामकुंड – पाडवा पटांगण
रविवार कारंजा यात्रा
साक्षी गणेश मंदिरापासून सुरुवात सकाळी ठीक ७ वाजता
मार्ग
साक्षी गणेश मंदिर – गाडगे महाराज पुतळा – मेन रोड – धुमाळ पॉईंट – रेड क्रॉस सिग्नल एमजी रोड – मेहर सिग्नल अशोक स्तंभ – रविवार कारंजा मेन रोड – धुमाळ पॉईंट – नेहरू चौक – पाडवा पटांगण
#newyear उद्या गुढीपाडवा. यानिमित्त नाशिक शहराच्या विविध भागातून शोभायात्रा सकाळी ७ वाजता काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत सहभागी व्हा, मराठी असल्याचा अभिमान बाळगा! pic.twitter.com/VhoGNjI1bo
— mynmc (@my_nmc) March 21, 2023
त्या अनुषंगाने, शनिवार १८ मार्च २०२३ रोजी “हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत असून या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील सर्व ढोल पथकांचे एकत्रित ‘महावादन’ (१००० ढोलांचे समूह वादन, सायंकाळी ६ वाजता), छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आले.
रविवार १९ मार्च २०२३ रोजी ‘पं. विष्णू दिगंबर पलुस्कर’ यांना समर्पित “अंतर्नाद” (१५०० हुन अधिक विद्यार्थ्यांचे हिंदुस्थानी शास्त्रीय गायन, नृत्य, वादन कलेचे सादरीकरण, सायंकाळी ६ वाजता) झाले. .
सोमवार २० मार्च २०२३ रोजी ‘पर्यावरण रक्षण या अंतर्गत ‘पंचमहाभूते’ या विषयाला अनुसरून “महारांगोळी” (२५००० स्क़्वे.फ फुट रांगोळी, सकाळी ६ वाजेपासून) संपन्न झाली.
मंगळवार २१ मार्च २०२३ रोजी ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन’ म्हणजेच ‘मृत्यंजय दिनानिमित्त’ तरुणांमध्ये स्वत्व जागरण करण्याच्या हेतूने ‘शिवकालीन शस्त्रविदया व त्याच बरोबर भारतीय व्यायाम पद्धती’ ज्यामध्ये सूर्यनमस्कार, चंद्र नमस्कार, भूमिवंदन असे विविध ‘भारतीय व्यायाम आणि प्रात्याक्षिके’ (सायंकाळी ६ वा.) सादर केले. तसेच ‘शिवकालीन विविध प्रकारचे शस्त्रे’ आबालवृद्धांना जवळून बघता यावी व हाताळता यावी या उद्देशाने ‘शस्त्रात्रांची प्रदर्शनी’ (सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत) मांडण्यात आले. हे प्रात्यक्षिक सव्यसाची गुरुकुलाचे श्री. लखन जाधव गुरुजी आणि त्यांचे विद्यार्थी यांनी दाखविले
बुधवार २२ मार्च २०२३ रोजी शहरातल्या विविध भागातून सकाळी ७ वाजता शोभा यात्रा होणार असून, पाडवा पटांगण (जुने भाजी पटांगण), गोदाघाट, पंचवटी , नाशिक याठिकाणी हे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
याकरिता महावादनातील सर्व सहभागी वादक, अंतर्नाद मधील सर्व गुरु व सर्व शिष्य आणि त्यांचे पालक, महारांगोळी च्या सर्व सहभागी महिला व स्वयंसेवक यांचा सराव मोठ्या उत्साहात सुरु आहे.
Gudhipadva Various Cultural Programs in Nashik