निलेश गौतम, सटाणा
मालेगाव तालुक्यातील प्रत्येक गाव खेड्याप्रमाणे बागलाण मधील गाव खेड्यांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही राज्याचे बंदरे व खणी कर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली. आज डांगसौंदाणे येथे सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डांगसौंदाणे उपबाजार समितीचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बागलांणचे आमदार दिलीप बोरसे हे होते.
यावेळी नामदार दादाजी भुसे यांच्या हस्ते उप बाजार समितीच्या कोणशिलाचे अनावरण करण्यात आले.पहिल्याच दिवशी उपबाजारात आलेल्या 65 वाहनांचा कांदा लिलाव शुभारंभ करण्यात आला. यावेळी बैलगाडीतून आलेल्या कांद्याला तीन हजार एक रुपये प्रतिक्विंटल भाव येतील स्थानिक कांदा व्यापारी जगदीश बोरसे यांच्या जय अंबिका ट्रेडिंग कंपनीने दिला चांगल्या दराने कांदा खरेदी केल्यामुळे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी जय अंबिका ट्रेडिंगचे संचालक यांचा सत्कार करीत त व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना दोन पैसे कसे मिळतील अशा दराने कांदा खरेदी करण्याच्या सूचना केल्या तर आगामी काळात प्रत्येक जिल्हा परिषद गटात महसूल विभागातर्फे महाराजस्व अभियानाची सुरुवात करून रेशन कार्ड जातीचे दाखले व अन्य कागदपत्रे देण्यासाठी मेळावे घेण्यात येणार असल्याचे यावेळी उपस्थित कार्यक्रमात बोलताना ना भुसे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंत्रिमंडळ शेतकरी हिताचे निर्णय घेत असून शेतकऱ्यांना कांदा अनुदान देण्याचे जाहीर केले व ते अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल यामध्ये शेतकऱ्यांकडून कांदा पिकाची नोंद ऑनलाईन पद्धतीने न झाल्यामुळे कांदा विक्रीच्या पावत्या असूनही लाभापासून वंचित राहू नये म्हणून येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपण हा मुद्दा प्रामुख्याने मांडून यावर तोडगा काढणार असल्याचे भुसे यांनी सांगितले यावेळी त्यांनी बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे यांच्या छत्रपती पेट्रोलियम या नवीन पेट्रोल पंपाचे उद्घाटन केले.
या कार्यक्रमास कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार बागलांणचे प्रांत अधिकारी बबन काकडे तहसीलदार जितेंद्र इंगळे ,तालुका सहाय्यक निबंध जितेंद्र शेळके, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती यतीन पगार, मविप्र सरचिटणीस दिलीप दळवी, माजी जि प सदस्य प्रशांत पपु तात्या बच्छाव ,बाजार समितीचे सभापती नरेंद्र अहिरे, उपसभापती केशव मांडवडे ,आर के ट्रेडिंगचे संचालक श्रीधर कोठावदे ,संचालक पंकज ठाकरे, तुकाराम देशमुख, जयप्रकाश सोनवणे, संजय बिरारी, मंगला सोनवणे ,सरदारसिंग जाधव, बाजार समितीचे सचिव भास्कर तांबे, भगवान अलई, पवार,आदि उपस्थित होते.
Guardian Minister Onion Auction Start Rate APMC Branch