सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पालकमंत्र्यांनी घेतला नाशिक मनपाच्या कामकाजाचा आढावा; यावर व्यक्त केली तीव्र नाराजी

by Gautam Sancheti
एप्रिल 25, 2022 | 7:45 pm
in स्थानिक बातम्या
0
edcdac6b 5278 41e0 9680 1c1ca4a2dcc0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महानगरपालिकेने शहराचा सर्वांगीण विकास करतांना शहराचे सौंदर्य अबाधित ठेवून विकास करावा. महापालिकेचे दायित्व दुपटीवर गेल्यामुळे आवश्यकता असलेलीच कामे करावी,शहरातील उड्डाणपुल व इतर विकास कामे आवश्यकतेनुसार करावी,जेणेकरुन नाशिकची स्काय लाईन खराब होता कामा नये. तसेच महापालिकेतील मंजूर असलेली अत्यावश्यक पदांची भरती प्रक्रिया तात्काळ राबवावी अशा सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

राजीव गांधी भवन येथे आयोजित महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार, अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे,करुणा डहाळे,उपायुक्त (प्रशासन) मनोज घोडे पाटील,अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे,गोदावरी संवर्धनचे उपायुक्त विजयकुमार मुंडे, उपायुक्त (कर) अर्चना तांबे, डॉ. दिलीप मेनकर,मुख्य लेखापरीक्षक किरण सोनकांबळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, महानगरपालिकेच्या अत्यावश्यक 695 पदांना मंजूरी आली आहे. सदरची पदे वैद्यकीय, पाणीपुरवठा व अग्नीशमन विभागाची असून मंजूरी मिळालेल्या पदांची लवकरात लवकर भरती प्रक्रीया राबविण्यात यावी.त्यांनी महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीचा सविस्तर आढावा घेतला. महानगरपालिकेवर 2800 कोटींचे दायित्व असल्याने आवश्यकतेनुसार कामे करण्यात यावी, असे पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी सांगितले.

नाशिक शहरात विविध महत्वाकांक्षी प्रकल्प राबवितांना ते सुटसुटीत असावे. मुंबईतील शिवाजी मैदान जेवढे महत्वाचे तेवढेच अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) आहे. त्या मैदानाला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे मोठे समारंभ घेण्यासाठी मैदान मोकळे राहण्यासाठी अनावश्यक बांधकाम टाळावे. तसेच नाशिक शहरात सर्वाधिक जॉगिंग ट्रक आहे. मात्र खेळासाठी व मोठ्या सोहळ्यासाठी शहरात जागा सापडत नाही. त्यादृष्टीने मैदान विकसित करण्यात यावे.

महानगरपालिकेकडून दिव्यांगासाठी इटीसी सेंटर सुरु केले जाणार आहे. या सेंटरच्या माध्यमातून शिक्षण, प्रशिक्षण व सेवा आणि इतर आवश्यक सेवा उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच शहरातील रस्त्यांची कामे दर्जात्मक करावी.रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत तक्रार आल्यास गुणवत्ता विभागाकडून तपासणी करावी,निकृष्ट कामे करणारांची गय करू नये. महानगरपालिकेच्या मोकळ्या जागांवर अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

कुंभममेळाकाळात नाशिक शहरात व शहराबाहेर रिंग रोडची कामे करण्यात आलेली आहे. त्यामुळे नव्याने प्रस्तावित केलेल्या बाह्य रिंगरोडचा अभ्यास करून मगच विकसित करण्यात यावे.फक्त भूसंपादन डोळ्यासमोर ठेवून प्रकल्प करू नये. शहरातील वाहतूक बेटांचा आकर्षक नाविन्यपूर्ण पद्धतीने सीएसआरच्या माध्यमातून विकसित करण्यास प्राधान्य देवून शहरात जाहिरातीसाठी आवश्यक स्पॉट विकसित करण्यात यावेत.म्हणजे महापालिकेला उत्पन्न सुध्दा मिळेल.

नमामि गोदा प्रकल्प अंतर्गत गोदावरी, चार उपनद्या व 67 नाले प्रदूषण मुक्त करण्याबरोबर गोदावरी व इतर नद्यांचे सोंदर्यीकरण करावे. गोदावरी व नंदिनी नदीला पुर्नवैभव प्राप्त करून देण्यास प्राधान्य देण्यात यावे. तसेच शहराच्या पाणी पुरवठा व सांडपाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे, जेणेकरुन दूषित पाणी नदीत जाणार याची काळजी घ्यावी, असेही श्री. पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले. तसेच अमृत २ योजनेअंतर्गत वाढीव पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
इतर ठिकाणी बिओटीवर विकसित करण्यात आलेल्या भूखंडाचा अभ्यास करूनच नाशिक येथील मिळकती विकसित करण्यास प्राधान्य द्यावे. या भुखंडावर शाळा, महाविद्यालय, रुग्णालय व समाजउपयोगी कामांना प्राधान्य देण्यात यावे.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक शहरातील काही स्थळांचा विकास महानगरपालिकेने स्वत: करावा. फाळके स्मारक बीओटी वर न देता ते महापालिकेने विकसित करावे, स्मारकाचा विकास करतांना काही सल्लागाराच्या कल्पना मागवून त्यांच्या कडून आर्कषक रचना करावी. फाळके स्मारक विकसित करतांना चित्रनगरीच्या धर्तीवर काही कल्पक करण्याचा विचार करावा.म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना विनामूल्य त्याचा लाभ होईल. तसेच सिंहस्थ कुंभमेळात सात ठिकाणी सुंटर घाटांची निर्मिती करण्यात आली आहे. या सर्व घाटांची नियमित देखभाल करण्यात यावी. कन्नमवार ते लक्ष्मीनारायण पुलाच्या दरम्यानचा घाट आणि तेथील मोकळ मैदानाचा वार चौपादी, प्रदर्शन, सभा, समारंभ,फेस्टीवल, कला, क्रिडा व इतर कार्यक्रमासाठी केल्यास शहराचे सौंदर्य अबाधित राहीत व पर्यटनात वाढ होवून महानगरपालिकेला शाश्वत उत्पन्न मिळेल.

शहरात आयटी पार्क विकसित करण्यासाठी विपुल जागा व त्यानुंषगिक सपोरटीव्ह इन्फ्रास्ट्रक्चर इ.बाबी या सगळ्यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यामुळे आयटीपार्क विकसित करतांना विचारपूर्वक निर्णय घेण्यात यावा. तसेच प्रगती मैदानाच्या धर्तीवर साधुग्रामच्या जागेवर पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात. मोकळी मैदाने, रुग्णालय, शिक्षण संस्था, ज्येष्ठ नागरिक संघाची सभागृह, अभ्यासिका केंद्रांची आवाजवी भाडे वाढ थांबवावी. तसेच कोरोना निर्बंध कमी झालेले आहे मात्र अद्यापही शहरातील काही गार्डन बंद आहेत.महानगरपालिकेचे उद्याने व सार्वजनिक ठिकाणे तात्काळ सुरु करण्यात यावी, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

सेंट्रल पार्क इत्यादी जी कामे 100 टक्के पूर्ण झालेली आहे अशा कामांचे उद्घाटन करून हे प्रकल्प लोकांसाठी खुले करून द्यावी, प्रकल्प बंद राहिली तर त्यांची वाताहत होत असते असे मंत्री भुजबळ म्हणाले.नाशिक महापालिकेच्या हद्दीतील जुन्या गावठाणांचा पुर्नविकास करण्यात यावा. तसेच नाशिक शहराचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी हेरिटेज समिती स्थापन करण्यात यावी. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीकरणासाठी भुखंड देण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करावी. सिटी लिंक बस सेवेचा प्रवाशांचा अनुभव चांगला असून शंभर टक्के क्षमतेने बसेस सुरु करण्यात याव्या, असेही पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी यावेळी महानगरपालिकेत गेल्या 2 वर्षापासून झालेले नियमबाह्य भूसंपादन, स्मार्ट सिटी,मलनिस्सारण प्रकल्पांचे अपग्रेडेशन,बिटको हॉस्पिटल मधील सुविधा, महापुरुषांची स्मारके, शहर स्वच्छता, महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतनातील फरक व इतर कामकाजाचा आढावा घेतला.
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपाआपल्या विभागाच्या कामकाजाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ऐका हो ऐका! पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी जमिनींना मिळणार एवढा दर

Next Post

जेव्हा कृषिमंत्री दादा भुसे जुगार अड्डा उदध्वस्त करतात….

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १५ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 14, 2025
Untitled 18
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत २८ कंटेनरमध्ये असलेला ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त; दोघांना अटक

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रात नाफेडकडून कांद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री…नाफेडने दिले हे स्पष्टीकरण

सप्टेंबर 14, 2025
rain1
संमिश्र वार्ता

नाशिकसह या जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता

सप्टेंबर 14, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

नाशिक रोड रेल्वे स्थानकातील होल्डिंग एरियाच्या कामांना मंजुरी…गर्दी व्यवस्थापनात होणार फायदा

सप्टेंबर 14, 2025
Screenshot 20250914 163749 Collage Maker GridArt
इतर

मविप्रच्या वार्षिक सभेत खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा (बघा व्हिडिओ)

सप्टेंबर 14, 2025
i4tUkRbQ 400x400
मुख्य बातमी

सातारा येथे होणा-या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
स्थानिक बातम्या

सत्ताधारी पायदळी तुडवतात तर विरोधक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात….कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

सप्टेंबर 14, 2025
Next Post
IMG 20220425 WA0080

जेव्हा कृषिमंत्री दादा भुसे जुगार अड्डा उदध्वस्त करतात....

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011