मंगळवार, ऑक्टोबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कांदा प्रश्नी पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतला हा निर्णय; प्रशासनालाही दिले निर्देश

सप्टेंबर 30, 2022 | 7:57 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220930 WA0021

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून ते महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या संकल्पनेतून सध्या सुरू असलेल्या सेवा पंधरवड्यात जनतेच्या नियमानुकुल कामांचा निपटारा करावा. तसेच अधिकाऱ्यापासून ते शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांनी सर्वसामान्य जनतेची कामे संवेदनशीलतेने करण्याच्या सूचना आज राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.

ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहात झालेल्या खासदर, आमदार व प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत संवाद साधतांना बोलत होते. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खासदार डॉ. सुभाष भामरे, हेमंत गोडसे, आमदार किशोर दराडे, देवयानी फरांदे, हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. नितीन पवार, शहर पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे व जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री भुसे म्हणाले की, सेवा पंधरवड्यात सेवा म्हणून जी जी कामे घेण्याचा मानस शासनाने केला आहे, ती कामे ही शासकीय कामकाजाच्या दैनंदिन कामकाजाचा भाग आहेत. अशी प्रलंबित सेवांची कामे केवळ पंधरवडा या कालमर्यादेत १०० टक्के पूर्ण करणे अपेक्षित आहेच त्याचबरोबर जी कामे होवू शकली नाहीत त्याबाबतच्या अडचणींचा आढावा जिल्हास्तरावर घेण्यात यावा व ती नियमानुकुल होण्यासाठी काय करावे लागेल यासाठीच्या उपाययोजना सुचविण्याचेही आवाहन श्री भुसे यांनी केले.

अतिवृष्टीची मदत लाभार्थ्यापर्यंत विनानिलंब पोहचावा
जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकासानीपोटी सुमारे ₹ ११ कोटी २४ लाखांचे अनुदान शासनामार्फत जिल्ह्यास प्राप्त झाले आहे. महसूल, कृषी व जिल्हा परिषदेच्या यंत्रणांनी ते वेळेत प्रत्येक लाभार्थ्यांना कसे मिळेल यासाठीचे नियोजन करावे. नियम, निकष व त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या बदलांचा विचार करून पंचनामे वेळेत पूर्ण करून शासनास शाघ्रतेने प्रस्ताव सादर करावा. अतिवृष्टीच्या लाभापासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्याही सूचना यवेळी पालकमंत्री श्री भुसे यांनी दिल्या.

पीक विम्याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हावा
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ प्रत्येक सहभागी आणि पात्र शेतकऱ्याला झाला पाहिजे. त्यासाठी विमा कंपनीशी संबंधीत अडचणी लक्षात घेवून कंपनी अधिकारी, महसूल अधिकारी व कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी समन्वयाने नियोजन करावे. नव्या बीड पॅटर्न प्रमाणे यात कंपनीचे दायित्वाचे प्रमाण अत्यल्प असल्याने यात संपूर्ण लाभ शेतकऱ्यांना कसा मिळेल यासाठी पीक विमा कंपनीचे अधिकारी यांच्यासमवेत जिल्हाधिकाऱ्यांनी एक बैठक घ्यावी, तसेच एन.डी.आर.एफ.च्या नव्या निकषाप्रमाणे अतिवृष्टीग्रस्त कुठलाही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना यावेळी पालकमंत्री श्री भुसे यांनी केली आहे.

कांदा खरेदी सुरू करावी
कांद्याच्या साठवणूक नुकसानी मुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी नाफेडच्या माध्यमातून तात्काळ कांदा खरेदी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक बैठक बोलवावी. ही हस्तक्षेप योजना असून शेतकरी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी यांच्यामाध्यमातून मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदीसाठी नाफेडच्या माध्यमातून प्रोत्साहन द्यावे, असेही पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

ग्रामीण भागातील अतिक्रमणे नियमित करावित
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील एकही व्यक्ती घरकुलापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रधानमंत्री घरकुल योजना राबविण्याचा संकल्प केला आहे. ग्रामीण भागात गावठाण जागांवर २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे ही नियमानुसार नियमित केल्यास हा संकल्प मोठ्या प्रमाणावर सिद्धीस जाईल. जे नागरिक गेल्या ५० पेक्षा अधिक वर्षांपासून गावठाण जागेत निवासी अतिक्रमण करून राहत आहेत, अशा नागरिकांकडे असलेले वीज बिल, कर भरणाच्या पावत्या, पाणी पट्टी भरल्याच्या पावत्या, मतदार यादीतील नोंद यातील कमीतकमी पुरावे आहेत, त्यांची निवासी अतिक्रमणे तात्काळ नियमित करण्याची प्रक्रिया सुरू करावी. त्यासाठी ऑनलाईन सुविधा बंद असल्यास ऑफलाईन काम सरू करावे. त्यासाठी वेळ आल्यास शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचेही पालकमंत्री श्री भुसे यांनी यावेळी सांगितले.

वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश येत्या शैक्षणिक वर्षापासून
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून नाशिक शहरात पदव्युत्तर पदवी महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी शासनामार्फत देण्यात आली आहे. लवकरच त्यासाठी लागणारी ३२ एकर जमीन विद्यापीठास महसूल विभागामार्फत दिली जाणार आहे. तसेच सद्यस्थितीत शासकीय रूग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. रूग्णालयाला लागून असलेली सार्वजनिक बांधकाम विभागाची वापरात नसलेली निवासस्थाने महाविद्यालयास वसतीगृह म्हणून वापरण्यास मान्यतेचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने वरिष्ठ पातळीवर तात्काळ सादर करण्यच्या सूचना यावेळी पालकमंत्री श्री भुसे यांनी दिल्या आहेत.

यावेळी लम्पी साथरोग, जिल्हा परिषद शाळांना रोहयो अंतर्गत वॉल कंपाउंड करणे, पाणी वळण योजना व इतर पाटबंधारे प्रकल्प, कार्गो वाहतुक व्यवस्था, जिल्ह्याची १५० वर्षपूर्तूी कार्यक्रमांचे नियोजन, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंक, नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प, सुरत-चेन्नई महामार्ग, सारथी वसतीगृह, अंगणवाड्यांना इमारत सुविधा, पूरहानीतील पुल, इमारती, एन.डी.ए. भरतपूर्वी प्रशिक्षण, हुतात्मा स्मारक दुरूस्ती तसेच त्यांचा अभ्यासिका, वाचनालय म्हणून वापर, नाशिक जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांचा विकास, आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टिने नियोजन, कलाग्रामचे प्रलंबित कामकाजांवर चर्चा करण्यात आली. चर्चेत उपस्थित आमदार खासदार यांनी आपल्या सूचना करत सहभाग नोंदवला.

कांदा निर्यात खुली : डॉ. भारती पवार
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर कुठलेही निर्बंध लावेलेले नसून कांदा निर्यात ही खुली आहे. त्याबाबत नाफेड व कृषी विभागाचे अधिकारी यांनी शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी. शेजारी राष्ट्रांची मागणी असेल तर आपण पुरवठा करतो हे धोरण आहे. त्यांची मागणी नसेल तर आपण पुरवठा करू शकत नाही. सद्यस्थितीत रशिया-युक्रेन युद्ध, श्रीलंकेतील मंदी याचा परिणाम यावर होत असला तरी केंद्र सरकारमार्फत मात्र कांदा निर्यात सुरू आहे, त्यासाठी आपण सतत पाठपुरावा करत आहोत, अशी माहिती यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.

Guardian Minister Dada Bhuse Direction to Administration

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सप्तशृंगीगडावर पाचव्या दिवशी ५० हजार भाविकांनी घेतले देवीचे दर्शन

Next Post

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर; विमानाने येणार आणि जाणार

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Paytm Gold Coin
संमिश्र वार्ता

पेटीएमवर प्रत्येक पेमेंटमधून मिळवा गोल्ड कॉइन

ऑक्टोबर 6, 2025
Photo 1
संमिश्र वार्ता

लातूरच्या मदियाचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते गौरव

ऑक्टोबर 6, 2025
G2fgPljW4AATov 1024x683 1
मुख्य बातमी

पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत अमित शहा म्हणाले….

ऑक्टोबर 6, 2025
IMG 20251005 222224
संमिश्र वार्ता

कोजागिरी पौर्णिमेला रात्री मसाला दूध, बासुंदी किंवा खीर का पितात?

ऑक्टोबर 5, 2025
Next Post
raj thakare

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर; विमानाने येणार आणि जाणार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011